निष्पाप चिमुकलीचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात गेला प्राण, जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – विवेकभैय्या कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
वन अधिकाऱ्यांना तोडपाणी करायला वेळ पण जबाबदारीची जाणीव नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहराजवळील टाकळी चर नजीक एका साडेतीन वर्षीय चिमुकलीचा बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बिबट्याने हल्ला केल्यामुळे त्यामध्ये त्या चिमुकलीचा प्राण गेला आहे.अतिशय दुर्दैवी खेदजनक घटना आहे.रेंजर,राऊंड ऑफिसर,फॉरेस्ट गार्ड यांना धारेवर धरत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणामुळे फैलावर घेतले होते.

टाकळी फाटा येथे मृतदेह घेऊन येत नगर मनमाड महामार्ग रोखत नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या निष्काळीपणाचे निदर्शन करत तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली त्यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी भूमिका व्यक्त केली तसेच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी त्यांच्या समवेत संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे हे देखील उपस्थित होते.




