Breaking
समता

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साई आश्रया अनाथाश्रमाला दिले १ लाख रुपये

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव

समता इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा समाजा प्रती आपली संवेदनशील जबाबदारी जपत करुणेचा नवा अध्याय लिहिला आहे. दिपावली निमित्त समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच पार पडलेला ‘Art Volcano – 2.0’ हा भव्य कलोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमाचे उद्घाटन पीपल्स को-ऑप.सहकारी बँकेचे माजी चेअरमन धरमशेठ बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शन-विक्रीतून विद्यार्थ्यांनी स्वतःतयार केलेल्या आकर्षक हस्तकलेच्या वस्तू विकून मिळालेली १ लाख रुपयांची रक्कम ‘साई आश्रया’ अनाथाश्रमातील निराधारांच्या मदतीसाठी समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने प्रदान करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ कला साकारली नाही, तर समाजाशी नातं घट्ट जोडण्याचा मौल्यवान धडा घेतला. प्रत्येक निर्मितीतून त्यांच्या कल्पकतेसोबतच संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भान प्रकट झाले. समता इंटरनॅशनल स्कूलने शिक्षणाला मानवी मूल्यांची जोड देत शिकत असतानाच विद्यार्थी दशेतच समाजासाठी काहीतरी करण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला आहे.समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना म्हणाले की विद्यार्थ्यांमधील सर्जन शीलता आणि संवेदन शीलता हीच शिक्षणाची खरी शक्ती आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ बुद्धीमान नव्हे, तर मनानेही समृद्ध होतात. समाजासाठी काही करण्याची ओढ हेच आमच्या शिक्षणाचे खरे यश आहे असे ते शेवटी म्हणाले यानंतर कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की Art Volcano – 2.0 हा फक्त एक कलोत्सव नाही तर विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, आत्मविश्वास आणि माणुसकीचा उत्सव आहे.

जाहिरात
जाहिरात

त्यांच्या कलेतून उमटलेली समाजसेवेची भावना हीच दिवाळीच्या खऱ्या प्रकाशाची अनुभूती आहे असे त्या शेवटी म्हणाले त्यानंतर प्राचार्य समीर अत्तार आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कलेतून व्यक्त झालेली समाज भावना हीच समता इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक प्रवासाची खरी दिशा आहे. या १ लाख रुपयांच्या मदतीत करुणा, जबाबदारी आणि संवेदन शीलतेचा सुंदर संगम दिसतो. शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान नव्हे, तर मनात माणुसकी जागवण्याची प्रक्रिया आहे असे प्राचार्य समीर अत्तार शेवटी म्हणाले यानंतर साई आश्रया अनाथा श्रमासाठी विद्यार्थ्यांनी १ लाख रुपयांची मदत सुपूर्द करताच सभागृहात भावनिक वातावरण तयार झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी आणि डोळ्यांत अभिमानाची चमक दाटून आली.या कृतीतून विद्यार्थ्यांनी केवळ कला मांडली नाही, तर समाजाशी जोडलेली माणुसकीही उजळवली तेव्हा Art Volcano – 2.0 ने या वर्षी कलेसोबत करुणेचा दिप प्रज्वलित करत शिक्षणाला मानवतेचा खरा अर्थ दिला. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समताचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या या हृदयस्पर्शी उपक्रमाचे मन भरून कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »