कोपरगावात लवकरच लायन्स – समता ब्लड बँकेची सुरुवात

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी नवनवीन उपक्रम व योजनांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यात समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव, व्यापारी महासंघ, तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, सुधन गोल्ड लोन या संस्था नेहमीच सहभागी होत असतात.या ही वर्षी समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात लवकरच लायन्स – समता ब्लड बँक सुरू होणार असल्याची घोषणा समता पतसंस्थेचे व लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी केली.

समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने समता सहकार सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी केली.समता परिवार, लायन्स क्लब व लिओ क्लब या संस्था कोपरगाववासीयांच्या हिताचे सामाजिक उपक्रम राबवित आहेत. सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी होणाऱ्या या संस्था आहेत. या नव्या ब्लड सेंटरमध्ये रक्ताचे सर्व प्रकाराचे घटक उपलब्ध होणार असल्याचे सवलतीच्या दरात उपलब्ध केले जाणार असल्याचे लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे सदस्य सुमित भट्टड यांनी सांगितले.प्रसंगी या रक्तदान शिबिरात कोपरगाव शहरातील सेवानिवृत्त शिक्षक प्रवीण सुधाकर वाणी यांनी तब्बल १३१ वे रक्तदान केले.

तर समता पतसंस्थेचे संचालक निरव रावलीया यांनी ९१ वे रक्तदान करून उल्लेखनीय सहभाग नोंदविला. ८० रक्तदात्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले.या वेळी समता पतसंस्थेचे संचालक निरव रावलिया, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, खजिनदार तुलसीदास खुबानी, सचिव प्रदीप साखरे, गुलशन होडे, किरण शिरोडे, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष अक्षय गिरमे, राजेश ठोळे, डॉ.अभिजीत आचार्य, धीरज कराचीवाला, हर्षल जोशी, समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर अत्तार, शिक्षक – शिक्षिका आदींसह लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.