Breaking
समता

‘सखी सर्कल’च्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

सखी सर्कल सदस्यांच्या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सर बाबत जनजागृती निर्माण व्हावी, तसेच महिलांना त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्याची सवय लागावी, या उद्देशाने ‘सखी सर्कल’च्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी येथील समता टायनी टॉट्स स्कूलच्या परिसरात हे शिबिर संपन्न झाले.या शिबिरात शिर्डी येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सई देशमुख, तसेच कोपरगावातील डॉ. रोशनी आढाव, डॉ. आस्था तिरमखे, डॉ. मेघा गोंधळी, डॉ. दिपाली आचार्य या तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांची तपासणी केली.

“स्त्री आरोग्य ही समाजाच्या आरोग्याची खरी शिडी आहे. प्रत्येक स्त्रीने वेळेवर पाऊल उचलून कॅन्सरसारख्या तपासण्या करून स्वतःला जपणं गरजेचं आहे. या उपक्रमातून आमच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याकडे जागरूकतेनं पाहिलं, हे आमच्यासाठी मोठं यश आहे. ‘सखी सर्कल’ पुढेही अशीच दीपस्तंभासारखी भूमिका निभावत राहील.” — सौ. स्वाती संदीप कोयटे, अध्यक्षा, सखी सर्कल

तपासणी करताना डॉक्टरांनी महिलांना कॅन्सर या रोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, व नियमित तपासणीचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.सखी सर्कल’च्या सदस्या सौ.स्वाती संदीप कोयटे, सौ. सिमरन खुबाणी, सौ.शालिनी खुबाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.या शिबिरात एकूण ४५ महिलांनी सहभाग नोंदवला, त्यामध्ये विविध वयोगटातील महिलांचा समावेश होता. यामध्ये काहींनी प्रथमच अशी तपासणी करून घेतल्याचे सांगितले. सहभागी महिलांना तपासणी अहवालासह आवश्यक ते वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.या उपक्रमासाठी सखी सर्कलच्या सदस्या सिमरन खुबाणी, शालिनी खुबाणी,

जाहिरात

तसेच इतर सदस्यांनी मोठी जबाबदारी पार पाडत उपक्रमाची रूपरेषा ठरवली, नोंदणी व व्यवस्थापनाचे काम नेटकेपणाने सांभाळले. परिसरातील महिलांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.सविता शिंदे या सहभागी महिलेने सांगितले की, “आमच्यासाठी ही तपासणी मोफत उपलब्ध करून दिली याबद्दल सखी सर्कलचे खूप आभार. यामुळे आम्हाला आमच्या आरोग्याबाबत जागरूकता आली आणि एका गंभीर आजाराबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.”‘सखी सर्कल’ ही संस्था कोपरगाव परिसरातील महिलांसाठी समाजोपयोगी, आरोग्यदायी व शैक्षणिक उपक्रम राबवणारी संघटना आहे. वेळोवेळी महिलांच्या हिताच्या अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी जनजागृती घडवून आणली आहे. पुढील काळातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या सदस्या स्वाती कोयटे यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »