Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कर्मवीर शंकररावजी काळे यांचा १३ वा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

इवलेसे रोप लाविलेये द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ या विश्व वंदनीय ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समुहाची उभारणी करून हजारो कुटुंबांचे प्रपंच उभे करून या परिसराचे नंदनवन केले. त्यांचे हे सामाजिक कार्य संतांच्या बरोबरीचे असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध प्रबोधनकार, कीर्तनकार निवृत्त आयएएस अधिकारी ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड यांनी केले आहे.सहकारातून शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे, समाजाच्या उन्नतीसाठी अखंड परिश्रम घेवून दूरदृष्टी आणि लोकसेवेच्या भावनेतून सहकार, शिक्षण, कृषी व सामाजिक कार्याची अविरत साधना करणारे व जनसेवेच्या मार्गावर दिपस्तंभ ठरलेले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड बोलत होते.ते पुढे म्हणाले की, भगवद गीतेतील आणि ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर ब्रम्हरस आहे.ज्या ठिकाणी भजन कीर्तन असते त्या ठिकाणी परमेश्वर असतो.

प्रेरणा, नेतृत्व आणि कार्यतत्परतेचे मूर्तिमंत उदाहरण असलेले मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांची वारकरी संप्रदायाशी नाळ जुळलेली होती. हा वारसा मा.आ.अशोकराव काळे यांनी जपला व हा वारसा पुढे चालवितांना आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने यावर्षी १३ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत मतदार संघाच्या सहा गटातील भजनी मंडळांना ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विना, पखवाज, हार्मोनिअम, दहा टाळ व एका सतरंजी हे साहित्य आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते भैरवनाथ भजनी मंडळ सुरेगाव, साई राघवेश्वर भजनी मंडळ कुंभारी, शिवकृपा भजनी मंडळ कान्हेगाव, नारायणगिरी महाराज भजनी मंडळ आपेगाव, जय हनुमान भजनी मंडळ मल्हारवाडी व सावता महाराज भजनी मंडळ पुणतांबा-रस्तापूर या भजनी मंडळांना देण्यात आले.

जीवनाचा उद्धार करायचा असले तर संताच्या सहवासात या अंतकरणापासून भक्ती करा. संत हे सत्याने व सद्विवेक बुद्धीने वागणारे असतात. ज्याप्रमाणे परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे संत हे देखील परीस आहेत संताच्या सहवासाने आयुष्याचे सोने होईल. ज्ञानेश्वरी, हरिपाठ हे देखील संत आहेत त्यांचे नियमित वाचन करा. तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.जो माणूस स्वत:वर प्रेम करतो तोच माणूस दुसऱ्यावर प्रेम करू शकतो.कर्म हा गीताचा आधार आहे आणि जे माणसं जीवनात येवून कर्म करतात कर्माने वीर होतात तीच माणसं कर्मवीर असतात.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम अलौकिक आहे. मी माझ्या कीर्तनात कधीही कुणाचे नाव कधी घेतले नाही मात्र ज्याप्रमाणे संत समाजासाठी जगतात त्याप्रमाणे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं आणि आपल्या वाट्याला आलेलं सत्कर्म करून गेले. त्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य हे संताच्या बरोबरीचे असल्याचे प्रबोधनकार ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड यांनी सांगितले.यावेळी मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, महानंदाचे मा.व्हा.चेअरमन राजेंद्र जाधव,बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, धरमचंद बागरेचा,विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, बाबासाहेब कोते, सिकंदर पटेल,संभाजीराव काळे, कचरू घुमरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे 

जाहिरात
जाहिरात

सर्वसंचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद,असी.सेक्रेटरी संदीप शिरसाठ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य,संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे वतीने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली. व शुक्रवार पासून आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सवास उपस्थित राहून मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच कमी खर्चात शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी व दुग्ध व्यवसायात प्रगती कशी करावी याबाबत तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.  

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »