मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे कोपरगाव भारतीय जनता पार्टी आणि शेतकऱ्यांच्या वतीने आभार – विशाल गोर्डे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मागील महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे कोपरगाव मतदारसंघ आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. हाता तोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. अशावेळी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शासन स्तरावर भरीव मदत मिळावी म्हणून मागणी करत कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली होती. नुकतेच शासनाकडून 31 कोटी 70 लाख एवढी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोपरगाव तालुक्यात मंजूर झाली आहे. याबद्दल कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या व शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष विशाल गोर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शासनाचे आभार व्यक्त केले आहे.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी म्हणून कोल्हे यांनी शासन व प्रशासनाला मागणी केलेली होती. या नुकसान भरपाईमुळे जरीही सर्वच नुकसान भरून निघू शकत नाही मात्र सण उत्सवाच्या तोंडावर मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती पुढे भाजपा युती शासन योग्य नियोजन करते आहे. स्थानिक ठिकाणी काही शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले असल्यास त्यांच्यासाठी कोल्हे यांनी शासनाकडे मागणी केलेली असून सर्व शेतकऱ्यांना या संकट काळात शासनाची मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे आग्रही असल्याचे स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी मत व्यक्त केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासन काळात शेतकऱ्यांना नेहमीच मदतीचा हात मोठा असतो. अनेकदा तीव्र स्वरूपाची असणारी नैसर्गिक संकटे पार करून यासोबतच शासनाच्या ध्येय धोरणांना पूर्ण करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत त्याबद्दल त्यांचे कोपरगाव भारतीय जनता पार्टी व शेतकरी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करत असल्याची भावना गोर्डे यांनी व्यक्त केली आहे.




