सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देवुन न्याय मिळविणारे नेतृत्व हरपले-कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अहिल्यानगर जिल्हयातील बु-हानगरचे सरपंच ते विधीमंडळातील राज्यमंत्री अशी ओळख असलेले राहुरी विधानसभेचे भाजपचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भानुदास कर्डीले यांच्या निधनाने आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देवुन न्याय मिळविणारे नेतृत्व गमावले अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.ते पुढे म्हणाले की, कै. शिवाजीराव कर्डीले यांनी दुग्ध व्यवसायातुन प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. राज्याच्या राजकारणांत अपक्ष आमदार म्हणून निवडुन आले होते.महाराष्ट्र राज्यात राज्यमंत्री म्हणून सेवा त्यांनी केली आहे. जनसामान्यांतुन त्यांनी आपल्यातील नेतृत्व कलागुणांना वाव दिला त्यामुळेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी त्यांची नाळ जुळली होती. अहिल्यानगर जिल्हा स्तरावर काम करतांना त्यांची आणि आपली अनेकवेळा चर्चा होत असे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबरोबर त्यांनी जिल्हयाच्या राजकारणांत काम केले. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या माध्यमांतुन त्यांनी शेतक-यांच्या उन्नतीसाठी सातत्यांने नव नविन उपक्रम राबवत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाची बातमी पाहून क्षणभर विश्वास बसत नव्हता कारण सर्वसामान्यांचा नेता, राजकीय दबदबा असणारे हे व्यक्तिमत्व हरपल्याने जिल्ह्यात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत सरपंच पासून ते मंत्री पदापर्यंत राजकीय प्रवास समाजाचे प्रश्न सोडवत त्यांनी केला. अतिशय स्पष्ट वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणून कर्डिले साहेबांनी आपली ओळख निर्माण केली होती. जिल्हा सहकारी बँक, विविध संस्था, विधानसभा सदस्य अशी पदे न्यायपूर्ण सांभाळण्याचे काम त्यांनी केले.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अक्षय आणि कर्डिले परिवाराच्या पाठीशी संजीवनी समूह उभा आहे. स्वर्गीय कर्डिले साहेब यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने आहिल्यानगर आणि राज्याच्या राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे, राजकारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आमदार स्वर्गीय श्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची वार्ता अत्यंत वेदनादायी आहे. अहिल्यानगरच्या राजकारणाला दिशा देणारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती लाभो.कर्डिले परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली जिल्हा बँकेचे संचालक व कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.




