संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेजच्या वेदांत गायकवाडची विभागीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने लांडेवाडी (पुणे) येथे घेण्यात आलेल्या विभागीय (पुणे, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, नाशिक व सोलपुर मिळुन) तायक्वांदो स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वेदांत सुभाष गायकवाड याने १९ वर्षे वयोगटा खालील ७२ ते ७६ किलो वजन गटात कांस्य पदकाची कमाई करून संस्थेची क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरा कायम राखली आहे,
संजीवनी परीवारात शैक्षनिक गुणत्तेबरोबरच क्रीडा आणि सैनिकी शिस्तीला विशेष महत्व दिले जाते.वेदांत गायकवाड सारखे विद्यार्थी आमच्या संस्थेचा अभिमान आहे. त्याचे हे यश म्हणजे त्याच्या मेहनतीचे संस्थेच्या समर्थ मार्गदर्शनाचा परिणाम आहे. त्याची ही प्रेरणा घेवुन इतर विद्यार्थीही प्रभावित होवुन क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करतील. प्रथम त्याने जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. संजीवनी शैक्षणिक संस्था ग्रामीण भागात असुन देखिल सुध्दा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, हे संजीवनीने अनेकदा सिध्द केले आहे. -विश्वस्त सुमित कोल्हे.
अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.वेदांतच्या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी खेळाडू वेदांत गायकवाड सह प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, क्रीडा प्रशिक्षक सुदर्शन पांढरे यांचे अभिनंदन केले.
					
				




