जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजचे घवघवीत यश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अहिल्यानगर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांमध्ये संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या तलवारबाजी खेळाडूंनी शारीरिक कौशल्य, रणनिती आणि मानसिक चपळतेच्या जोरावर वेगवेगळ्या वयोगटात सुवर्ण, रजत व कांस्य पदकांची कमाई करून क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व सिध्द केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने के. बी. रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे या स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धांमध्ये १४ वर्षे वर्शे वयागटांतर्गत इयत्ता ६ वी मधिल कॅडेट पार्थ सोनवणे याने दमदार खेळ करत सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षांखालील वयोगटात इयत्ता ९ वीचा कॅडेट स्पर्श शिवरकर हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. इयत्ता १० वीतील कॅडेट वेदांत खेतमाळस आणि चेतन जाधव यांनी प्रत्येकी रजत पदक मिळविले, तर कॅडेट साई बोळीज याने कांस्यपदक मिळविले. १९ वर्शांखालील गटात इ वीचा कॅडेट वेदांत गायकवाड याने रजत पदक तर कॅडेटइ १११ वीचा जयेश साळुंखे याने कांस्यपदकाला गवसणी घातली.

या सर्व विजेत्या खेळाडूंची निवड सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या यशामागे तलवारबाजी प्रशिक्षक पवन शिरसाट सर यांचे परिश्रम व दर्जेदार मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. नियमित सराव, शिस्तबद्ध तयारी आणि स्पर्धेतील आत्मविश्वास या गुणांमुळे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे तसेच प्राचार्य कैलास दरेकर यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.तलवारबाजी सारख्या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास व लढाऊ वृत्ती निर्माण होते. अशा यशामुळे संजीवनी संस्थेच्या क्रीडा संस्कृतीला बळ मिळत आहे.