Breaking
संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल

राजेंद्र झावरे ४५ वर्षे ठाकरेंसोबत असलेला शिलेदार आज अखेर शिंदे सेनेत

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत अनेक नेते पक्षांतर करतांना अनेक जणं दिसत आहेत. बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीतील पक्षात प्रवेश केला आहे.अशातच कोपरगाव शहरसह संपूर्ण आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले राजेंद्र मुरलीधर झावरे हे ४५ वर्षापासून एकनिष्ठेने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत राहिले मात्र पक्षाने माझी दखल न घेतल्यामुळे राजेंद्र झावरे यांनी मागील ४५ वर्षापासूनची उद्धव ठाकरेंची साथ सोडत अखेर हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अहिल्यानगर जिल्हासह अनेक तालुक्यांमध्ये उबाठा सेनेला मोठे खिंडार पडले असून कोपरगाव नगरपरिषदेच्या उबाठा गटाचे माजी नगराध्यक्षासह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे व उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील कार्यालयात शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले यावेळी एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना म्हणाले की, ही स्वर्गिय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे.राजेंद्र झावरे यांनी खऱ्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कोपरगाव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांचे प्रवेश इथून पुढेही सुरूच राहणार आहे. हीच बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे येथेच कार्यकर्त्यांना जीव लावून न्याय दिला जातो.२००१ च्या निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत होणार असल्याचा ठाम विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.

राजेंद्र झावरे यांनी उबाठा सोडतांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की मी मागील ४५ वर्षांपासून शिवसैनिक आहे. शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख,लोकनियुक्त नगराध्यक्ष,जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशी विविध पदे सांभाळण्याची मला संधी मिळाली.त्याबद्दल मी ठाकरे परिवाराचे ऋण व्यक्त करतो तसेच माझ्या मनात ठाकरे परिवाराबद्दल प्रचंड आदर आहे. परंतु आता आपल्या पक्षात काम करणे मला शक्य नाही तेव्हा राजेंद्र झावरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने कोपरगाव मधील राजकारणाला एक वेगळे वळण मिळणार आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांचाही शिंदे सेनेत प्रवेश झाला आहे.राजेंद्र झावरे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगरचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,सोमनाथ शिंगाडे, विधानसभा प्रमुख किरण खर्डे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,उप शहरप्रमुख विकास शर्मा, शेखर कोलते,बाळासाहेब साळुंखे,राहुल देशपांडे,अमजद शेख,
सतीश शिंगाणे,वैभव गीते,विजय सोनवणे, विजय शिंदे,वर्षाताई शिंगाडे, सलीम कांदेवाले, अरुण बोर्डे,सुनील कुंढारे,जाफर सैय्यद,सनी काळे आदी पदाधिकार्‍यांसह ७०० कोपरगाव तालुका रिक्षा व टॅक्सी संघटना सभासद यांनी राजीनामे देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत झावरे यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन औताडे, तालुका प्रमुख मनील नरोडे,शहर प्रमुख अक्षय जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.झावरे यांच्या प्रवेशानंतर कोपरगावमध्ये शिंदे शिवसेनेची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »