संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या बाल दिंडीने घडवले पंढरपूरच्या वारीचे दर्शन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख, डोक्यावर तुळस, भगवी पताका हाती घेत टाळांच्या सुंदर तालावर फुगडीचा ठेका धरत, विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल रुखमाईच्या सानिध्यात पावली व लेझिम खेळत ‘संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी शहरातून दिंडी काढत कोपरगावकराना पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविले. पर्यावरणाचा समतोल राखा, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज, पाणी अडवा पाणी जिरवा अशा अनेक जन जागृती पर संदेशाचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेवून जनजागृती केली.हरी आणि वारी हा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय असून आषाढी जवळ आली, की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ती ओढ लागते पंढरपूरच्या वारीची.
विठ्ठलाच्या दर्शनाची. लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीसाठी पायी पंढरपूरला जातात. या आषाढी वारीची अनुभूती शालेय विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष व संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल’च्या विद्यार्थ्यांची पायी दिंडी कोपरगाव शहरातून काढण्यात आली होती.
या पायी दिंडीतील वारकऱ्यांनी शहरातून विठ्ठल-रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेत ही दिंडी कोपरगांव शहरातील जुने गावठाण भागात ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील विठ्ठल-रुख्मिनी मंदिर आणि सोमेश्वर महादेव मंदिरात आणण्यात आली. याप्रसंगी वारकरी विद्यार्थ्यांनी भजन कीर्तन करत हरिनामाचा जयघोष केला. या दिंडीमध्ये छोट्या वारकऱ्यांनी हरिनामाचा जयजयकार करत फुगडी खेळत, टाळ वाजवत या वारीचा आनंद लुटला आहे.
या वेळी या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने प्रसाद म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले.तसेच श्रीमंत पवार सरकार चे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने दिंडीचे पुजन करून बालगोपाळांना राजगिरा लाडू वाटप करत स्वागत करण्यात आले.या प्रसंगी श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापक नारायण अग्रवाल,महावीर शिंगी, जयंत विसपुते, प्रदिप शास्री पदे,नंदू शेंडे (गुरव), मनोज कपोते, प्रदिप पदे, श्री दत्तपार देवस्थानचे विश्वस्त हेमंत पटवर्धन, संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे,गोरक्षण महिला भजनी मंडळाच्या रजनीताई ठोंबरे,शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे,उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.