दिलीप कानडे यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे केले वाटप

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील परवानाधारक दस्तलेखक, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष व मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप बाबुराव कानडे यांचा वाढदिवस त्यांनी कोपरगाव नगरपालिका शाळा क्रमांक ६ मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाला जो अनावश्यक खर्च असतो तो टाळून हा उपक्रम कानडे परिवाराने राबविला या प्रसंगी दिलीप कानडे यांनी सांगितल की माझे शिक्षण याच शाळेत झाले असल्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य याची नितांत आवश्यकता असते त्यामुळे कानडे परिवाराने शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप दुय्यम निबंधक कुसाळकर माजी.नगरसेवक मंदार पहाडे,आर सी एम महिला राज्य कार्यकारणी सदस्या सौ स्नेहा दिलीप कानडे,उद्योजक आकाश डागा शाळेच्या मुख्याध्यापिका एस. डी.साळुंके,माणिक कदम, सोमसे मॅडम,कैलास भारस्कर, संदेश कानडे,रोशन डागा
संकेत कानडे,बबलू कानडे, रोहन कांबळे,उमेश बारसे,
आदी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते