अखिल भारतीय भिक्खु संघ प्रणित बुध्द धम्म प्रसारक मंडळ ट्रस्टच्या वतीने वर्षावास निमित्ताने धम्मदेसनेचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील नगर- मनमाड महामार्गावरील लुंबिनी उपवन बुध्द विहारात रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी संभाजीनगर येथील पूजनीय भंन्ते अत्तदिप यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास निमित्त कोपरगाव येथील अखिल भारतीय भिक्खु संघ प्रणित बुध्द धम्म प्रसारक मंडळ ट्रस्टच्या संकल्पनेतून कोपरगाव शहर व परिसरातील उपासक व उपासिका यांच्यासाठी वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त सकाळी तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थित भंन्ते अत्तदिप हे उपस्थित उपासक व उपासिका यांना धम्म देशना देणार आहेत तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उपासकांनी धम्म श्रवण करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन बुध्द धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच उपस्थित सर्व उपासकांसाठी आयु.ॲड. रोहित भिमराज गंगावणे व उपासिका आयुष्यमानिनी स्नेहा रोहित गंगावणे व गंगावणे परिवाराच्या वतीने भोजन दानांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.