कोपरगाव तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित साधून या अभियानाची उद्या दिनांक १७ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे हे अभियान ३१ डिसेंबर पर्यंत चालणार आहे.या अभियानाचा उद्देश असा आहे की सुशासन युक्त पंचायत तयार करणे.तसेच ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. त्याचप्रमाणे
गावे जलसमृद्ध स्वच्छ व हरित करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे,उपजीविका विकास करणे व सामाजिक न्याय देणे,लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.याबाबत प्रशासनामार्फत ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ,स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग मिळवून “आदर्श ग्रामपंचायत” घडविण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे अंमलबजावणी व सनियंत्रण ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखालिल एक समिती करणार आहे. तसेच प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार साठी ग्रामपंचायतीची निवड करण्याकरिता जिल्हास्तरावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुकास्तरावर गटविकास अधिकारी हे मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतील यासाठी प्रशासनाच्या वतीने पुरस्काराची रक्कम ठरवण्यात आले असून त्यासाठी तालुकास्तर प्रथम क्रमांकास १५ लक्ष रुपये द्वितीय क्रमांकास १२ लक्ष रुपये आणि तृतीय क्रमांकास ८ लक्ष रुपये देण्यात येणार आहे तसेच जिल्हास्तर प्रथम क्रमांकास ५० लक्ष रुपये तर द्वितीय क्रमांकास ३० लक्ष रुपये तसेच तृतीय क्रमांकास २० लक्ष रुपयांचे बक्षीस मिळणार आहे

त्याचप्रमाणे विभाग स्तरावर प्रथम क्रमांकास १ कोटी रुपये तर
द्वितीय क्रमांकास ८० लक्ष रुपये तसेच तृतीय क्रमांकास ६० लक्ष रुपयांचे बक्षीस मिळणार आहे त्याचप्रमाणे राज्यस्तर प्रथम क्रमांकास ५ कोटी रुपयांची बक्षीस तर द्वितीय क्रमांकास ३ कोटीचे बक्षीस असून तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना व त्या योजनांचा फायदा तळागाळातील गोर गरीब नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच सर्व अभियानामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केले आहे.