Breaking
संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल

पालकांनी मुलांमध्ये चांगल्या संस्कारांची रुजवन करणे गरजेचे- माजी सैनिक गोपीनाथ गांगुर्डे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र दिन अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता,ज्ञानेश्वर माऊली,माता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. झेंडा वंदन भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक सुभेदार गोपीनाथ गांगुर्डे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक हवालदार अजित आढाव होते.

पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष किरण भोईर,संचालक पोपट झुरळे,ॲड.शंकर यादव,दिलीप सोनवणे,कार्यकारी संचालक विशाल झावरे,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब भाबड,मुख्याध्यापक सचिन मोरे,इरफान शेख,राहुल देशपांडे,ललित ठोंबरे,सचिन मोरे,विजय शिंदे,अक्षय नन्नावरे,रवी पवार,दिपक दळे व नरेश बैरागी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शाळेच्या शिक्षिका चैताली पुंडे यांनी करून दिला. इयत्ता १० वी च्या विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे औक्षण केले तसेच १० वी तील विद्यार्थ्यांनी मार्च पास करत पाहुण्यांना सलामी दिली. या वेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते भेट वस्तू देत गुण गौरव करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीतांवर संस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित करून योग्य दिशेने वाटचाल केल्यास यश संपादन करणे सहज शक्य होते. तसेच पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिल्यास ते विनम्र होऊन त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचण्यास मदत होते व त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. असे मोलाचे मार्गदर्शन भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक सुभेदार गोपीनाथ गांगुर्डे यांनी केले व तसेच त्यांनी त्यांच्या सैन्य दलातील कामगिरीचा अनुभव सर्व विद्यार्थ्यांना सांगितला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सचिन मोरे व शिक्षिका प्रियांका निकम यांनी केले तर आभार मनीषा राऊत यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »