विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेज कटिबद्ध -सुमित कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने इ. ११ वी व इ. १२ वी हा आयुष्याचा महत्वाचा टप्पा असतो. पालकांच्या दृष्टीने त्यांची खरी संपत्ती ही त्यांची संतती असते. पालक मुलांवर खुप प्रेम करतात. असे असताना देखिल त्यांनी आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी मनाला मुरड घालत त्यांना घरापासुन दुर ठेवण्याचा निर्धार केला. त्यांनी डोळ्यात साठविलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी चांगला अभ्यास करा, भरपुर खेळा आणि नवनवीने कौशल्ये आत्मसात करा. पालकांनी निश्चिन्त रहावे, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासाठी संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कटीबध्द आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले. संजीवनी सैनिकी ज्युनिअर कॉलेजमध्ये नव्याने इ. ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. यावेळी प्राचार्य कैलास दरेकर, सर्व विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते. कोल्हे पुढे म्हणाले की ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना सैनिकी मुल्यांचे प्रशिक्षण मिळावे, ते देशाच्या संरक्षण दलात अधिकारी व्हावेत, या हेतुने माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजची स्थापना केली. संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर सुध्दा वेगवेगळे कीर्तिमान स्थापित करीत आहेत.

संजीवनीच्या विविध संस्थांमध्ये सुमारे अठरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे पालकांना सांगितले. तसेच संस्थेचे विविध मानस जसे आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षण, म्युझिक अंतर्गत ब्रास बँड प्रशिक्षण व विविध देशी विदेशी खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. वाद विवाद, गटचर्चा यावर भर दिला जाईल असे सांगितले. सध्याची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. विद्यार्थ्यांना चालू घडामोडींचे ज्ञान मिळावे म्हणून वर्तमानपत्रे उपलब्ध असतील.आलेल्या सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजन व आदरणीय स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रायफल ग्रुपने तयार केलेल्या कमानीतून व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सुदर्शन पांढरे यांनी केले. त्यात त्यांनी सैनिकी स्कूलच्या स्थापनेपासून तर आत्तापर्यंतच्या प्रगतीचा अहवाल पालकांपुढे ठेवला. प्राचार्य दरेकर यांनी सैनिकी शाळेत शिस्तीचे असलेले महत्त्व विशद केले. विद्यार्थी योग्य रीतीने घडण्यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच शालेय वेळापत्रक, शालेय नियमावली व विविध स्पर्धा परीक्षांसाठी शाळा घेत असलेल्या प्रयत्नांची माहिती पालकांना दिली.