संजीवनी ज्यु. कॉलेजचा व्हालीबॉल संघ तालुका स्तरीय स्पर्धेत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत सजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या व्हॉॅलीबॉल संघाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती आयोजीत तालुका स्तरीय १९ वर्षे वयोगटातंर्गत मुलांच्या व्हॉलीबाल स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवुन मागील वर्षाची परंपरा याही वर्शी कायम ठेवली. संजीवनी ज्युनिअर कॉलेजने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात तालुक्यात आपला दबदबा कायम ठेवला, अशी माहिती संजवनी ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की तालुका स्तरीय मुलांचे व्हॉलीबॉल सामने संजीवनी ज्यु. कॉलेजच्या मैदानावर पार पडले.

यात तालुक्यातील सात संघांनी सहभाग नोंदविला. संजीवनीचा संघ मागील वर्षी विजेता असल्याने पहिला सामना बाय (पुढील चाल) मिळाला. उपांत्य फेरील संजीवनीच्या संघाने के.जे. एस. ज्युनिअर कॉलेज विरूध्द लढुन थेट अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत आत्मा मालिक इंटरनॅशनल ज्यु. कॉलेज संघाशी संजीवनीच्या संघाने सामना केला. यात पहिल्या दोन सेट मध्ये संजीवनीचे गुण २५-१७ व २२-२५ राहील्याने तिसरा निर्णायक सामना खेळावा लागला. यात संजीवनीच्या संघाने आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत १५-९ अशा गुणांनी दणदणित अंतिम विजय संपादित केला. आता जिल्हा स्तरीय सामने नेवासा येथे होणार असुुन संजीवनीचा संघ कोपरगांव तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल.खेळाडूंमध्ये ओम गणेश जगताप, नमन राजू शर्मा, आयुष पंकज शिंदे , यश कैलास जाधव, सत्यम भाऊसाहेब आभाळे, रितेश संतोष कोळगे, ऋषिकेश ज्ञानदेव नळे, ध्रुव विशाल जैन, प्रत्युष दिनेश कोल्हे, ऋषिकेश बाळासाहेब देवकर, नैतिक पारस ठोळे व सार्थक सचिन दगडू यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील जिल्हा स्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले, त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला तसेच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्या अनुश्रिता सिंह, उपप्राचार्य एम.केए सोनवणे, जिमखाना विभाग प्रमुख नानासाहेब लोंढे, व्हॉलीबॉल कोच शिवराज पाळणे, सागर निकम, अक्षय येवले उपस्थित होते.