Breaking
संजीवनी उद्योग समूह

कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीला नाशिक विभागातुन मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान 

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत पुणे यांच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या बाजार समित्यांना वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळयात नाशिक विभागातुन कोपरगांव कृषि उत्पन्त बाजार समितीने उत्कृष्ट कामगिरीचा मान पटकावत तिस-या क्रमांकाचा मानाचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळवून आपल्या कार्याचा राज्यभर ठसा उमटविला आहे. उत्कृष्ट कामगिरी, पारदर्शक कारभार, शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणं, त्यांच्या मालाची खरेदी विक्री सुलभ करणे, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, सलग अ वर्ग, शेतक-यांना रोख पेमेंट, जनावरे,भाजीपाला, उपबाजार येथे शेतकरी वर्गाला दिलेल्या सुविधा आणि शेतक-यांच्या हिताला प्राधान्य देणा-या योजनांचा सखोल आढावा घेऊन बाजार समितीने केलेल्या

जाहिरात

‌उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवुन हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.हा पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा,उपाध्यक्ष सुर्यवंशी संचालक ॲड‌.सुधीर कोठारी, मानकर तसेच महिला संचालिका यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार कोपरगांव बाजार समितीला प्रदान करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे,संचालक साहेबराव लामखडे, खंडू फेपाळे, रामदास केकाण, प्रकाश गोडे, बाळासाहेब गोडे, ऋषीकेश सांगळे, रेवननाथ निकम, लक्ष्मण शिंदे, संजय शिंदे, शिवाजी देवकर, राजेंद्र निकोले, रावसाहेब मोकळ, अशोकराव नवले, रामचंद्र साळुंके, मिराताई कदम, माधुरीताई डांगे, यांच्यासह सचिव नानासाहेब रणशुर आदी उपस्थित होते. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आमदार आशुतोषदादा काळे,विवेकभैय्या कोल्हे, राजेश आबा परजणे,नितीन औताडे यांच्या मार्गदर्शना खाली बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम उपसभापती गोवर्धन परजणे व सर्व सन्मा. संचालक हे बाजार समितीचा कारभार उत्कृष्ट व पारदर्शक करीत असून मागील ३ वर्षात अनेक उपक्रमाव्दारे बाजार समितीने आदर्श कामगिरी बजावली आहे.

जाहिरात

याच पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांमध्ये कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीने वेगळेपण सिध्द करून तिस-या क्रमांकांचा हा मानाचा बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल सभापती, उपसभापती, सचिव नानासाहेब रणशूर यांनी सर्व सदस्य,अधिकारी,कर्मचारी, खरेदीदार व्यापारी, हमाल मापाडी वर्ग व इतर बाजार घटकांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले असून या पुरस्काराने समितीच्या कार्याला नवी उर्जा मिळाली आहे. यापुढेही बाजार समितीचे हिताचे कामे करून शेतकरी बांधवांच्या हितासाठी अधिक उपयुक्त व नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »