Breaking
संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

गुरू मुळेच विद्यार्थ्यांची प्रगती- चंदन शिरसाठ

संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये नवगतांचे स्वागत

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात गुरूची भुमिका महत्वाची असते. वीस वर्षांपूर्वी मी संजीवनी मधुनच इंजिनिअर झालो. येथिल प्राद्यापकांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच समुह चर्चा, भाषा कौशल्य, अशा अनेक बाबींची रूजवण केली. येथिल ज्ञानाच्या जोरावर मी एकुण आकरा आण्विक अणुभट्यांचे काम करू शकलो. म्हणुन आवर्जुन सांगावेसे वाटते की गुरू मुळेच विद्यार्थ्यांची प्रगती होत असते, असे प्रतिपादननाशिक येथिल टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपेंटस् प्रा. लि. कंपनीचे जनरल मॅनेजर व संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे माजी विद्यार्थी चंदन शिरसाठ यांनी केले.संजीवनी के. बी. पी. पॉलीटेक्निकमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या स्वागत कार्यक्रमात शिरसाठ प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टीट्युटसचे मॅनेजिंग ट्रस्टी अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य ए. आर. मिरीकर, दुसरे पाहुणे माजी विद्यार्थी व सध्या पुणे येथिल शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयात पदवी शिक्षण पुर्ण करीत असलेले रितेश औताडे, सर्व विभाग प्रमुख व डीन्स उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांची संख्या उल्लेखनिय होती.प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून सांगीतले की संजीवनीला यशस्वी परंपरा असुन ही ४३ वी बॅच आहे. तसेच संजीवनी पॉलीटेक्निकने राज्य व देश पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थापित केलेल्या कीर्तिमानांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जागरूकता, राहणीमान, सकारात्मक वृत्ती, स्वतःची चांगली ओळख निर्माण करणे आणि नवीन टेक्नॉलॉजी जाणुन घ्यावी, अशा मुल्यांचा अंगिकार करावा, असे सांगीतले. शिरसाठ पुढे म्हणाले की संजीवनी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मुळे तांत्रिक शिक्षण मिळाले. तिच परंपरा अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे समर्थपणे पुढे नेत असुन संजीवनीचा प्रवास थक्क करणारा आहे. युवा शक्ती ही देश घडवणारी असते.

जाहिरात

भारतीय अर्थ व्यवस्था झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. भारतीय उद्योगांचा जगात दबदबा आहे. यात इंजिनिअर्सची भुमिका अत्यंत महत्वाची मानली जाते. भविष्यात भरपुर संधी आहेत, परंतु वेगळेपण सिध्द करावे लागेल. समस्या सोडविण्याची क्षमता, परीवर्तनशिलता , शिकण्याची वृत्ती आणि व्यावहरीक अनुप्रयोग, इत्यादी बाबींचा स्वीकार करा. औताडे म्हणाले की येथे चांगले जगण्याबरोबरच प्रात्यक्षिकासह चांगले तांत्रिक ज्ञान मिळाले. प्रोग्रामींग शिकण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्ष स्थानावरून अमित कोल्हे म्हणाले की पदवी एखाद्याला कामासाठी पात्र करते परंतु विविध कौशल्ये ही रोजगार मिळण्यायोग्य बनवतात. विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी येथे सर्व बाबींची उपलब्धता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारत २०४७ साली देश विकसीत असेल, असा मानस आहे. यासाठी तरूणाई म्हणुन सध्याच्या पिढीची भुमिका महत्वाची असणार आहे. एखाद्या बाबतीत अपयश आले तर खचुन न जाता पुन्हा प्रयत्न करा. अशी प्रगती करा की भविष्यात आई वडीलांसह आम्हालाही अभिमान वाटला पाहीजे. भविष्यात चांगला रोजगार मिळण्याच्या दृष्टीने येथे जापनीज, कोरीयन, जर्मन व फ्रेंच भाषा शिकविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या भाषा शिकविण्याचे चांगले परीणाम सिध्द झाले आहे.प्रा. आय. के. सय्यद यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डी.ए. पाटील यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »