विद्यार्थ्यांनी उज्ज्वल आणि भव्य असे यश प्राप्त करावे – प्राचार्य डॉ.माधव सरोदे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे एस.एस.जी.एम कॉलेजमध्ये “ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत शिस्त,गांभीर्य तसेच नैतिकमूल्ये यांचे पालन करून कॉलेजच्या विविध उपक्रमांत आणि आयोजित होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धात सहभागी व्हावे,असे आवाहन प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी केले.
ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे आयोजित प्रथम वर्ष बी.कॉम.आणि एम.कॉम.वर्गाच्या इंडक्शन प्रोग्राम प्रसंगी बोलत होते. आपल्या मनोगतात त्यांनी, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी असते. तेव्हा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा व संस्थेचा नवलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करावा असा आशावाद याप्रसंगी व्यक्त केला. प्रस्तुत कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु.आस्मा सलीम पठाण, कु.श्रावणी भसाळे, कु.अनुष्का संगमनेरे, कु.अवंतिका खरात या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर प्राचार्यांच्या शुभहस्ते नवप्रवेषित गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विविध विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागांची व उपक्रमांची माहिती दिली; त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रा.डॉ.ए. बी.भागवत,विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती डॉ.रंजना वर्दे, विद्यार्थी विकास मंडळाविषयी प्रा.डॉ.एम.आर. यशवंत,परीक्षा विभागाविषयी प्रा.एस.डी.रणधीर,स्पर्धा परीक्षेविषयी प्रा.ए.पी.इंगळे, शॉर्ट टर्म कोर्सची माहिती प्रा. एस.एस.काकडे, संशोधन विभागाविषयी प्रा.डॉ.व्ही. एल.गाढे,राष्ट्रीय सेवा योजने विषयी प्रा.डॉ.बी.ए.तऱ्हाळ, सांस्कृतिक विभागाची माहिती प्रा. डॉ. एस. पी. पवार,

तसेच आय.क्यू. ए. सी. विषयी विस्तृत माहिती प्रा. डॉ. एन. व्ही. मालपुरे, एन.सी.सी. विभाग प्रा. डॉ. एस. बी. चौधरी, ग्रंथालय प्रा. सी. टी. खैरनार, जिमखाना विभाग प्रा. डॉ. व्ही. एस. पवार तक्रार निवारण डॉ. एस.आर. दाभाडे या सर्वांनी आपापल्या विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध सेवा आणि सुविधा समजावून सांगितल्या. सदर कार्यक्रमासाठी शास्त्रशाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, कलाशाखा प्रमुख प्रा. डॉ. एम. आर. यशवंत, प्रा. एस. ए. महाले, प्रा. एस. आर. खैरनार, प्रा. एन. एस. दळवी, तसेच बी.बी.ए. विभागातील एम.बी. गवारे, सी.सी. वाघ, एस. एम. भांगरे, पी. बी. गव्हाळे, यांसह वाणिज्य शाखेतील नवीन प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत व प्राचार्यांचा परिचय प्रा. डॉ. अर्जुन भागवत यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रा. दिलीप भोये यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.प्रतीक्षा संवत्सरकर,डॉ.माया शेलार, प्रा.मयुरी देवकर यांनी केले.