Breaking
आत्मा मालिक

आत्मा मालिकच्या डिंपल बागुल हिची आय.आय.टी. इंजिनिअर साठी निवड

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या प्रांगणात पहीली पासुन १० पर्यंत उत्तम दर्जेदार शिक्षण मिळाल्यामुळे आदिवासी पाड्यात राहणारी डिंपल अशोक बागुल ही विद्यार्थ्यांनी आज थेट आय आय टी मध्ये इंजिनिअर होत आहे. आदिवासींच्या मुलीची हि गगनभरारी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाची मान उंचावणारी आणि आदिवासी बांधवांच्या अभिमानाची बाब आहे. अशी भावना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार यांनी व्यक्त केली.आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये राज्यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून दरवर्षी विविध प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी येत असतात. अनेक पालकांना आपला पाल्याने येथे शिक्षण घेतला पाहीजे ही आशा ठेवून आहेत.

आदिवासींच्या मुलांना उत्कृष्ट प्रकारचे पायाभूत शिक्षण आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात मिळत असल्यामुळे रानावनात झोपडीत राहणाऱ्या गरीब आदिवासींचे मुलं आयआयटी सह अनेक क्षेञात चमकत आहेत.

कारण येथील शैक्षणिक वातावरण विश्वात्मक गुरुदेव माऊलींच्या सानिध्यात आधुनिक सुखसुविधा नियुक्त आहे.समाजाच्या सर्वच स्तरातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची सुविधा आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात असल्यामुळे येथे आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावत आहे. गावखेड्यातील, आदिवासी भागातील गोरगरीब मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सर्व यंञणा अविरत असल्याने येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावी पर्यंत आदिवासी विकास विभाग नामांकित योजना अंतर्गत शिक्षण घेतलेली कळवण प्रकल्पातील डिंपल अशोक बागुल ही विद्यार्थीनी सध्या आय आय टी खडगपूर येथे बी.टेक. (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) करीता पाञ ठरली. पहीली पासुन दर्जेदार शिक्षणाचे धडे गिरवण्याचे बाळकडू आत्मा मालिक संकुलातून मिळाले त्याच शिक्षणाच्या जोरावर डिंपल बागुल हि आदिवासी मुलगी आय आय टी मधून इंजिनिअर होण्यास पाञ ठरली. डिंपल इंजिनिअर होत आहे याचा अभिमान सर्वांना आहे.या संदर्भात अधिक माहीती देताना नंदकुमार सुर्यवंशी पुढे म्हणाले की, आदिवासी विभागाच्या नामांकित योजनेतील विद्यार्थी आता उत्तम यश मिळवत आहेत, हे खरोखरच प्रेरणादायी आहे.

जाहिरात

आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणेबाबत हे एक उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणे आपल्या भविष्याकडे जिद्द व चिकाटी ठेवून ध्येय पूर्ण शिक्षणाची वाटचाल करणे त्यामुळेच हे शक्य झाले आहे. आत्मा मालिकच्या शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता यावरून अधिक स्पष्ट दिसते. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्याना यशाच्या शिखरावर पोहचवण्याचे काम आत्मा मालिक संकुल करीत आहे. या महान कार्यासाठी सद्गुरु आत्मा मालिक माऊलींचे कृपाशीर्वाद कायम सर्वांवर आहेत असेही ते म्हणाले. डिंपल बागुल हिच्या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माऊलींच्या कृपाआशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी तसेच सर्व विश्वस्त, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, वसतिगृह व्यवस्थापिका मीरा पटेल, प्राचार्य माणिक जाधव, मिनाक्षी काकडे , विभाग प्रमुख भारती तांबे , दत्तात्रय जावळे , मोतिराम कु-हे तसेच आत्मरूप विभागाचे सर्व शिक्षकवृंद या सर्वांचा डिंपल बागुल सह अनेक विद्यार्थी घडविण्यात सिंहांचा वाटा आहे. या सर्वांनी डिंपल बागुल व तिच्या पालकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »