आत्मा मालिकच्या बालनाट्यास उत्कृष्ट नाट्य निर्मिती पुरस्कार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव २०२५ चा नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून त्यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण या शाळेला “विसर्जन” या बालनाट्यासाठी तर गुरुदेव चैतन्य स्वरूप गुरुकुल नेर्ले ता. वाळवा जि. सांगली या शाळेला “डोक्यात गेलयं!” या बालनाटयांसाठी ‘उत्कृष्ट नाट्य निर्मिती पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे चि. वैष्णव निमसे बालनाट्य ‘विसर्जन’ (कोकमठाण शाखा) चि.रोहन वाघिरे व अभिनया खाडे बालनाट्य “डोक्यात गेलयं!” (नेर्ले शाखा) कु.श्रद्धा शिंदे बालनाट्य ‘मला उत्तर हवय’ (पुरणगाव शाखा) कु. प्राची वाघ बालनाट्य ‘मॅडम’ (पुरणगाव शाखा) कु. रिदीमा सातवे “बालनाट्य फुलराणी” (शहापूर शाखा) या सहा विद्यार्थ्यांना अभिनय गुणवत्ता प्रथम श्रेणी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यासर्व यशस्वी विद्यार्थ्याचा आश्रमाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हटले की, शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात स्वतंत्र कला, क्रीडा, संगीत, नृत्य व अभिनय यांचे प्रशिक्षण तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे या सर्वच क्षेत्रात आत्मा मालिकचे विद्यार्थी यशस्वी भरारी घेत आहे. यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांना कला विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शन बागडे,दिग्दर्शक दिलीप सपकाळ, रॉबिन लोपीस, सहाय्यक दिग्दर्शक वसंत नारद यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे प. पू.आत्मा मालिक माऊली व संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त उमेश जाधव, विष्णुपंत पवार, प्रदीपकुमार भंडारी, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,मीरा पटेल,सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, आदींनी अभिनंदन केले.