महाराष्ट्र प्रज्ञाशोध मध्ये आत्मा मालिकचे ३०० विद्यार्थी पाच विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा उच्चांक आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल, कोकमठाण ने साकारला आहे. गुरुकुलाचे एकुण ३०० विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. यामध्ये राज्य गुणवत्ता यादीत ५ विद्यार्थी, जिल्हा गुणवत्ता यादीत ४ विद्यार्थी, विशेष प्राविण्यात १४ विद्यार्थी, तालुका गुणवत्ता यादीत २१ विद्यार्थी, उत्तेजनार्थ गुणवत्ता यादीत १३ विद्यार्थी, तर प्रमाणपत्रासाठी २४३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.यामध्ये यश केने राज्यात ४ था, श्लोक कदम राज्यात १३ वा, ओम वाळुंज राज्यात १३ वा, श्रेयश नलावडे राज्यात १४ वा, हर्षवर्धन उंडे राज्यात १५ वा तर राज हासे जिल्हयात २ रा, आयुष वामन जिल्हयात २ रा, अभिजीत जांभाळकर जिल्हयात ४ था, श्रेयश भवर जिल्हयात ४ था यांनी स्थान मिळवीले.आत्मा मालिक पॅटर्न अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी केली जाते.

त्यासाठी स्मार्ट सण्डे, सुवर्ण पहाट अभ्यासिका, घटकनिहाय सराव, विशेष तयारी वर्ग, दिर्घ सुट्टयांमध्ये तयारी शिबीरे, तज्ञांचे मार्गदर्शन, लेखक आपल्या भेटीला हे उपक्रम राबविले जातात त्याची ही फलश्रुती असल्याची माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, रविंद्र देठे, रमेश कालेकर, बाळकृष्ण दौंड, मिना नरवडे, सागर अहिरे पर्यवेक्षक नयना शेटे, गणेश रासने, सुनिल पाटील, नितीन अनाप यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाआशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मिरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे यांनी अभिनंदन केले.