आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर म्हणजे संस्काराची शिदोरी – संत परमानंद महाराज

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहराजवळील कोकमठाण येथे आत्मा मालिक बालसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या मनोरंजन,विविध खेळ, जलतरण, कला, नृत्य,
अभिनय इत्यादी गुणांना वाव दिला जातो. त्याचबरोबर प्रामाणिकपणा,स्वयंशिस्त वेळेचे महत्व,स्वच्छता, व्यायाम,देशप्रेम,नित्य ध्यान, योगा,प्राणायाम या संस्काराची शिदोरी विद्यार्थ्याला या शिबिरातून मिळते त्यामुळे त्यांच्या जीवनात नियमित अमुलाग्र बदल होईल यात शंका नाही असे प्रतिपादन संत परमानंद महाराजांनी केले ते आत्मा मालिक बालसंस्कार शिबिराच्या द्वितीय स्नेहसंमेलन आत्मविष्कार सोहळ्यात बोलत होते.
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये दिनांक २० एप्रिल ते १० मे २०२५ या कालावधीत बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरात ७ दिवस दुसरी बॅच १८ दिवसाच्या बॅचचा पारितोषिक वितरण व आत्मविष्कार सोहळा संपन्न झाला.या शिबिरामध्ये कला क्रीडा नृत्य अभिनय,जलतरण या विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या आत्मविष्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक या विषयावर अप्रतिम नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच “ पाणी हेच जीवन” हे बाल नाट्य सादर करून त्यातून “पाणी आडवा पाणी जिरवा” हा संदेश उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना दिला तसेच शिबिरार्थींनी बहारदार गाण्यांचे सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आत्मविष्कार सोहळ्यामध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी शिबिरार्थीर्नी पार पाडली ८ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या

अप्रतिम सादरी करणामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते या सोहळ्यासाठी सोनी मराठी फिल्म गजानन शेगावचे या मालिकेतील स्वरा मुसळे या प्रमुख पाहुण्या होत्या.त्यांनी सदर मालिकेतील संवाद शिबिरार्थी समोर सादर केला. या कार्यक्रमासाठी विश्वस्त तथा संत परमानंद महाराज, संत गणेश महाराज व संत मांदियाळी तसेच आश्रमचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,विश्वस्त जाधव भाई पटेल,प्रकाश गिरमे,प्रकाश भट,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे सर्व प्राचार्य,विभाग प्रमुख,आदी मान्यवर उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कालेकर व अजय देसाई यांनी केले.