कोपरगाव भाजपा नूतन शहराध्यक्ष वैभव आढाव यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मित्र फाऊंडेशनचे संस्थापक वैभव आढाव यांची भारतीय जनता पार्टी कोपरगाव शहराध्यक्ष पदी निवड झाल्याच्या अनुषंगाने, मित्र फाऊंडेशन आणि वैभव आढाव मित्र परिवार यांच्या वतीने भव्य जाहीर नागरी सत्कार समारंभ रविवार, ४ मे २०२५ रोजी व्यापारी धर्मशाळा, कोपरगाव येथे संपन्न झाला.समारंभाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य सहकार महर्षीं कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या समवेत वैभव आढाव यांनी दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आणि वंदन करून करण्यात आली.या प्रसंगी संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे, माजी गटनेते रविंद्रअण्णा पाठक,दिलीपराव दारुणकर,बाळासाहेब नरोडे, माजी शहराध्यक्ष डी.आर. काले,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे सोनवणे,
विजयराव आढाव आदीसह आजी माजी नगरसेवक,विविध पक्षांचे पदाधिकारी,व्यापारी, प्रतिष्ठित मान्यवर,मित्र फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी भारतीय जनता पार्टीचे नव्याने नियुक्त शहराध्यक्ष वैभव आढाव यांचा नागरी सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी बोलताना नितीनदादा कोल्हे म्हणाले अतिशय योग्य वेळी वैभव आढाव यांना पक्षाने संधी दिली आहे.नेतृत्वाने टाकलेल्या विश्वासाला ते सार्थ न्याय देतील आणि समाज आणि परिसराची सेवा या संधीतून करतील.अतिशय निकटचे संबंध कोल्हे परिवार आणि आढाव परिवाराचे आहेत त्यामुळे वैभव आढाव यांना परिवारातील एक सदस्य या भावनेने आशीर्वाद आहेत त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित राहिल्याचे कौतुक करत ही खरी ऊर्जा आहे ज्यामुळे कामाचा उत्साह वाढतो असे म्हणाले.युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मित्र फाउंडेशन हे दीडशे पेक्षा अधिक रक्तदान शिबिरे घेणारे संघटन वैभव आढाव यांनी जपले आहे.

उत्तम संघटन आणि मितभाषी स्वभाव यामुळे मोठा मित्रपरिवार त्यांनी शहरासह ग्रामीण भागात देखील जोडला आहे.येणाऱ्या कालखंडात नगरपालिका निवडणुका आहेत त्यात मोठा विजय आपल्याला खेचून आणण्यासाठी वैभव आढाव यांचा कार्यकाळ महत्वाचा ठरणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाने पक्ष भरारी घेतो आहे.जगातील सर्वात मोठा पक्ष आणि मतदारसंघातील देखील सर्वात मोठा पक्ष असणारा भाजपा आहे. बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली उत्तम काम करण्यासाठी वैभव आढाव यांना पक्षाच्या वाढीसाठी बळ देणार असल्याचे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.यावेळी वैभव आढाव यांनी ही संधी दिल्याबद्दल नेतृत्वाचे आभार मानले.मित्र परिवाराने आयोजित केलेल्या सत्काराने अधिक ऊर्जा मिळाली असून मतदारसंघातील नेतृत्व आणि पक्ष पाठीशी असल्याने पक्ष संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करणार असल्याचे मत व्यक्त केले.