शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिकचे ३५० विद्यार्थी राज्यात प्रथम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाली होती. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वाधिक विद्यार्थी पात्र होण्याचा उच्चांक आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम ने साकारला आहे या गुरुकुलाचे ३५० विद्यार्थी पात्र झाले आहे. यामध्ये २५० गुणांच्यापुढे १३ विद्यार्थी, २२० गुणांच्यापुढे ६४ विद्यार्थी, २०० गुणांच्या पुढे १२५ विद्यार्थी तर १८० गुणांच्यापुढे २१६ विद्यार्थी आहेत. इयत्ता ८ वी मध्ये चि.श्रेयश नलावडे २७४ गुण,कु.धनश्री रक्ताटे २७२ गुण,चि.श्रेयश भवर २७२ गुण,चि.श्रीजीत इंगोले २६८ गुण,चि.सिद्धार्थ पगारे २६८ गुण,कु.तुळशी थोरात २६० गुण,चि. यश केणे २६० गुण, चि.पृथ्वीराज टोमे २५६ गुण, चि.हासे राज २५२ गुण, चि. शिवराज पाटील २५० गुण, चि.सोहम उंडे २५० गुण, मिळवून बाजी मारली आहे.तर इयत्ता ५ वी मध्ये चि.रितेश लपटे २६२ गुण,चि.राजवीर कालेकर २५२ गुण,चि. ओमकार गोल्हार २४६ गुण , चि.त्रैलोक्य चव्हाण २४६ गुण, चि.जगदीश लोहकरे २३८ गुण,चि.वेदांत कोठुळे २३८ गुण,कु.स्वराली जाधव २३४ गुण,चि.श्रीतेज दागडे २३२ गुण,चि.साईनाथ गाडे २३० गुण,चि.साई कराळे २२६ गुण,

चि.साई सुरसे २२२ गुण,चि. तुषार गर्जे २२२ गुण,मिळवून बाजी मारली आहे.सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश परीक्षा शालेय परीक्षांमध्ये आत्मा मालिक अव्वल स्थानी असून हे स्पर्धा परीक्षांच्या आत्मा मालिक पॅटर्नचे यश आहे असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे,विभाग प्रमुख रमेश कालेकर,शिवम तिवारी, सचिन डांगे,रवींद्र देठे,अनिल सोनवणे,बाळकृष्ण दौंड,मीना नरवडे,पर्यवेक्षक नितीन अनाप,नयना शेटे,गणेश रासने,सुनील पाटील तसेच विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी या विद्यार्थ्यांचे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीप कुमार भंडारी,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वस्तीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदींनी अभिनंदन केले आहे.