संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सात अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने टीसीएस, आरस्क्वेअरसॉफ्ट टेक्नॉलॉजिज व एसिअन हर्ट या कंपन्यांचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजीत केला होता. यात या तिन कंपन्यांनी कॉलेजच्या अंतिम वर्षातील सात नवोदित अभियंत्यांची चांगल्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाने एका पाठोपाठ एक अशा अनेक कंपन्यांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यात आघाडी घेतली आहे, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये टीसीएस कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या ऋतिका रामचंद्र घावटे व अच्युत अजय सारंगधर यांची निवड केली आहे.आरस्क्वेअरसॉफ्ट टेक्नॉलॉजिज कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या रोहित प्रकाश चव्हाण व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जालिंदरनाथ सुभाष कांगणे आणि तुषार सुधाकर पेटकर यांची निवड केली आहे.एसिअन हर्ट कंपनीने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सिध्दी सतीश आमले व अथर्व सचिन जोशी यांची निवड केली आहे.संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण भागातील अनेक मुला मुलींना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत असल्याने ते आपल्या कुटूंबाचा आधार बनत आहे.

तसेच त्यांच्या पगाराचा पैसाही ग्रामीण भागात येत असल्याने ग्रामिण अर्थ कारणाला बळकटी मिळत आहे. दरवर्षी साधारण हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना संजीवनीच्या प्रयत्नातुन नोकऱ्या मिळवुन दिल्या जातात. यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असुन पालकांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास सार्थ ठरत आहे. नोकरी असो, विविध स्पर्धा असो, परदेशातील इंटर्नशिप व एमएस असो, या सर्व आघाड्यांवर संजीवनी आघाडी घेत आहे, यामुळे पालकांचा संजीवनी पॅटर्नवरील विश्वास अधिकाधिक दृढ होत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.