आत्मा मालिक मध्ये राष्ट्रीय आयुर्वेद सेमिनारचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र शासन अनुदानित आयुर्वेद युनानी महाविद्यालयीन अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत एनसीआयएसएम नवी दिल्ली,आयुष्य संचालनालय मुंबई,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, आणि एमसीआयएम मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी आत्मा मालिक ध्यानपीठ येथे“आयुर्वेद युनानी: सिनर्जिस्टिक सायन्स फॉर हॉलिस्टिक हेल्थ” या विषयावर राष्ट्रीय सेमिनार २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर संघटना ही राज्यस्तरीय शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांनी सन २००५ मध्ये स्थापन केलेली असून सदर संघटना ही २०११ मध्ये अधिकृत नोंदणी शासन स्तरावर झालेली आहे सदर संघटनेचे मुख्यालय मुंबई येथे असून त्याच्या शाखा १६ अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय व तीन युनानी महाविद्यालयात सुरू आहेत सुमारे ३५० अध्यापक सदस्य म्हणून नोंदणी झालेली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. सुरेश पोघाडे यांनी दिली. यावेळी आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.सदर सेमिनारच्या उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक म्हणून नामदार प्रतापराव जाधव आयुष केंद्रीय मंत्री,नवी दिल्ली. प्रमुख अतिथी नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब आणि अध्यक्ष म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच कार्यक्रमास आमदार आशुतोष दादा काळे, आमदार संग्राम भैय्या जगताप,आमदार संजय कुटे, आमदार किरण लहामटे, माननीय आमदार डॉ.ज्योती गायकवाड,आमदार किशोर दराडे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सुधाकरराव अडबले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तसेच माननीय लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर, कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,डॉ. रमण घुंगरालेकर, संचालक आयुष्य, डॉ.मिलिंद आवारे,अधिष्ठाता आयुर्वेद विद्या शाखा व प्रतिकुलगुरू डॉ.मिलिंद निकुंभ हे उपस्थित राहणार आहेत.या सेमिनारमध्ये डॉ. नारायण जाधव, अध्यक्ष मार्बिझम एनसीआयएसएफ नवी दिल्ली हे “हक्क कर्तव्य व वैद्यकीय नीती” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर डॉ.गोपाकुमार हे कुलसचिव, थ्रिसुर केरला विद्यापीठ. “त्वचारोगावर” मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पद्मनाथ केसकर,आपत्ती वैद्यकीय व्यवस्थापक, रुबी हॉल पुणे हे “आपत्ती व्यवस्थापन व दैनंदिन वैद्यकीय व्यवसाय” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉ.जगन्नाथ दिक्षित, प्रा.स्वस्थवृत्त सामाजिक औषधे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे हे “स्थौल्य व मधुमेह” या व्याधीमध्ये “दिक्षित जीवनमान पद्धतीचा उपयोग” या विषयावर आपले विचार प्रकट करणार आहेत. डॉ.श्रीनिवा सुलू हे “आम” या संकल्पनेवर जीवनशैलीमध्ये सहभाग स्पष्ट करणार आहेत. तर बेंगलोर येथील डॉ. हमीदुद्दीन हे आपले विषय मांडणार आहेत.त्याशिवाय सेमिनारमध्ये विविध प्रकारचे औषधी कंपन्या पुस्तक प्रकाशक हे स्टॉल लावणार आहे. तसेच विद्यार्थी अध्यापक हे सेमिनार मध्ये संशोधन पेपर पोस्टर मॉडेल सादर करणार आहेत.

तसेच गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय अहिल्यानगर यांचे मार्फत “विविध आयुर्वेद वन औषधी वनस्पतींचे” प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सदर सेमिनारसाठी डॉ. दिलीप वांगे प्रबंधक एमसीआयएम, डॉ. श्रद्धा सुडे सहाय्यक आयुष संचालक मुंबई, डॉ. अनिता कोल्हे सहाय्यक आयुष संचालक पुणे, डॉ.धनंजय हांगे सहाय्यक आयुष संचालक नागपूर व आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी आणि त्यांचा संपूर्ण कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.सदर सेमिनार यशस्वीतेकरिता माननीय डॉ. अभय पाटकर- आ. से. संघ आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक.अध्यक्ष शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय संघटना, डॉ. मुकेश शुक्ला- के.जी.मित्तल आयुर्वेद महाविद्यालय, मुंबई, सचिव, डॉ.सुरज एल.ठाकूर- गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहिल्यानगर, कार्याध्यक्ष, डॉ. सुरेश पोधाडे- श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, गुरुकुंज आश्रम,कोषाध्यक्ष तसेच ऑर्गनायझिंग कमिटी चेअरमन डॉ.सुरज एल.ठाकूर व ऑर्गनायझिंग कमिटी सचिव डॉ.प्रवीण पेटे- आयुर्वेद महाविद्यालय, सांगली तसेच इतर सदस्य व सर्व आयुर्वेद व युनानी महाविद्यालयाचे शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.