आत्मा मालिकचा ‘करण चरवंडे’ राज्यात प्रथम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व आर टी एस सी फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या रॅशनॅलिस्ट टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये ‘आत्मा मलिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाने सलग चौथ्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.करण चरवंडे याने राज्यात प्रथम तर श्रेयश भवर जिल्ह्यात प्रथम व तन्वेष भोई याने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुल, कोकमठाण सर्व स्पर्धा परीक्षांसह, प्रवेश परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये राज्यात अव्वल स्थानावर असून ही केवळ शाळा नाही तर ही एक विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण, सुसंस्कारित, सर्वगुणसंपन्न, सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व घडविणारी तपोभूमी आहे असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले.

या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, पर्यवेक्षक गणेश रासने, विषय शिक्षक राजेंद्र जाधव, पंकज गुरसळ, सुवर्णा ढगे, विद्या खोसे, रीना कोरे, भैरवनाथ कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीप कुमार भंडारी , शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदिंनी अभिनंदन केले.