सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश मिळवून महाविद्यालयाची मान उंचावली असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.

महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी गाढेची प्रजासत्ताक दिन पूर्व संचालन निवड चाचणी शिबिरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या वतीने निवड करण्यात आली आहे. विद्यापीठ स्तरावर आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव (जल्लोष २०२५) मध्ये कु.आकांक्षा शिंदे या विद्यार्थिनीने माती काम या कला प्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नूतन महाविद्यालय मिरजगाव येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत कबड्डीच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.यामध्ये पवन वाघडकर या विद्यार्थ्यांची आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये उज्वल कातोरे या विद्यार्थ्यांची ६३ किलो वजन गटामध्ये निवड होवून सोमेश्वरनगर ता.बारामती येथे होणाऱ्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे,संस्था निरीक्षक प्रा.नारायण बारे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ.विजया गुरसळ, क्रीडा संचालक डॉ. राजेंद्र चव्हाण, प्रा.भीमराव रोकडे, प्रा. विशाल पोटे, प्रा.सिकंदर शेख ,प्रा. सोमनाथ खरात यांचे मार्गदर्शन लाभले.