संजीवनी इंटरनॅशनल स्कूलची कलात्मक जिमनॅस्टिक स्पर्धेत पदकांची कमाई

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अहिल्यानगर जिल्हा जिमनॅस्टिक असोसिएशनच्या वतीने कोपरगांव येथे घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय कलात्मक जिमनॅस्टिक स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या जिमनॅस्टिक पटूंनी आपले शारीरिक कौशल्य दाखवुन वेगवेगळ्या वयोगटात सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई करून या क्रीडा प्रकारातही अव्वल असल्याचे सिध्द केले. आता सुवर्ण पदक विजेते खेळाडू अहिल्यानगर जिल्ह्याचे नतृत्व करणार आहे, अशी माहिती स्कूलने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या स्पर्धेत मुलांच्या आठ वर्षांखालील वयोगटात राजवीर अभिजीत कोते याने सुवर्ण पदक मिळविले तर मुलींच्या गटात रीत आनंद भंडारी हिने सुवर्ण, सनाया समिर पाटील हीने रौप्य व पीहू प्रितेश पिपाडा हिने कांस्य पदक मिळविले. दहा वर्षाखालील मुलींच्या गटात मीरा विलास कोतकर हीने सुवर्ण व आराध्या अच्युत कातोरे हीने रौप्य पदक मिळविले. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात गटात अर्पिता अतुल गोंदकर हीने सुवर्ण, तपस्या सागर लांडगे व राजनंदिनी स्वप्निल भोसले यांनी रौप्य पदकांची कमाई केली. याच गटात मनस्वी पंकज पाटील व तनिष्का प्रवीण रोकडे यानी कांस्य पदकांची कमाई केली. सतरा वर्षांखालील गटात मेरिष्का सिध्दार्थ सबलोक हीने सुवर्ण पदकाची कमाई केली.कलात्मक जिमनॅस्टिक हा खेळ क्रीडा प्रकारातील एक अत्यंत आकर्षक आणि शारीरिक कौशल्य दाखवणारा प्रकार आहे. खेळाडू या खेळात त्यांच्या शरीराच्या लवचिकतेसह, शारीरिक क्षमता आणि कलात्मक सर्जशीलता दाखवितात.

सन १८९६ मध्ये या क्रीडा प्रकाराचा समावेश ऑलिंपीकच्या अधिकृत क्रीडा प्रकारांमध्ये करण्यात आला. संजीवनी इंटरनॅशल स्कूलमध्ये शैक्षणिक गुणत्तेसह प्रत्येक क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण दिल्या जाते. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थी भाग घेवुन बक्षिसे जिंकुण येतात, हे या स्कूलच्या बाबतीत समिकरण बनले आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व पदके प्राप्त विद्यार्थ्यांंचे अभिनंदन करून सुवर्ण पदक विजेत्यांना राज्य स्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी स्कूलच्या प्राचार्या रिना रजपुत, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके, क्रीडा प्रशिक्षक विरूपक्ष रेड्डी व आकांक्षा पाखले उपस्थित होते.