कोपरगांव तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी धनंजय देवकर तर सचिवपदी अनुप गिरमे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा नुकतीच कोपरगाव तालुका क्रीडा संकुल येथे सन २०२५-२६ विविध खेळ स्पर्धा व नूतन कार्यकारिणी निवड करण्यासाठी आयोजन केले होते.सदर सहविचार सभेच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोशिएशनचे सहसचिव तथा अहिल्यानगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव मकरंद को-हाळकर हे उपस्थित होते.अहिल्यानगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे सर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू व कोपरगाव तालुका क्रीडा संकुल सदस्य राजेंद्र पाटणकर व ज्येष्ठ क्रीडाशिक्षक विठ्ठल होन,सुधाकर निलक,अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक सचिन जाधव आदि याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन नियोजन संदर्भात चर्चा करून सन २०२५-२६ वर्षाची क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक ठरवले गेले.

या प्रसंगी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी शारदा इंग्लिश मेडीयमचे क्रीडाशिक्षक धनंजय देवकर यांची अध्यक्षपदी तर संजीवनी इंग्लिश मेडीयमचे क्रीडाशिक्षक अनुप गिरमे यांची सचिव म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये सुधाकर निलक, निलेश बडजाते,अजित पवार, शिवराज पाळणे हे उपाध्यक्ष,तर राजेंद्र देशमुख व अशोक गायकवाड हे सहसचिव तर कार्य कारिणी सदस्य म्हणुन रमेश येवले, सुनील कदम, वीरूपाक्ष रेड्डी, अस्मिता रायते यांचा समावेश करण्यात आला.याप्रसंगी तांत्रिक समिती सदस्य म्हणुन नितीन निकम, योगेश बिडवे रिजवान पठाण,लतीफ शेख,ऋतिक भाबड ,भामरे नेद्रे तर जिल्हा प्रतिनिधी शिवप्रसाद घोडके आदी निवड करण्यात आली.या सहविचार सभेला सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप गिरमे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवप्रसाद घोडके यांनी मानले.