श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे जिल्हा विज्ञान स्पर्धेत उल्लेखनीय यश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाने जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेत विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.नुकत्याच झालेल्या स्पर्धेत
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे इयत्ता ६ वी व ८ वी असे एकूण ४८ विद्यार्थी तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेकरिता बसले होते. हे सर्व विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी इयत्ता ९ वी चा साई नारायण कुलकर्णी तालुक्यात व्दीतीय तर इयत्ता ६ वी तील विद्यार्थिनी वेदिका अजितसिंग परदेशी हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेआहे.या सर्व विद्यार्थ्याचा गौरव विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,

संस्थेचे सदस्य संदीप अजमेरे,डॉ.अमोल अजमेरे,
राजेश ठोळे तसेच मुख्याध्यापक रमेश गायकवाड,उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे, पर्यवेक्षक अनिल अमृतकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या प्रसंगी डॉ.अमोल अजमेरे यांनी विदयार्थांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.श्वेता मालपुरे यांनी केले.तर प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांनी केले.तर आभार प्रदर्शन धनंजय देसाई यांनी केले.सुरेंद्र शिरसाळे,निलेश होन, कुलदीप गोसावी,संजय बर्डे,पंकज जगताप, साळुंखे मॅडम,वाडीले मॅडम,डरांगे मॅडम,जाधव मॅडम,गंगवाल मॅडम आदि सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते.