श्री.गो.विद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शालेय गणवेशाचे वाटप

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंच व जेष्ठ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील गरीब गरजू होतकरू व आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाच्या वतीने व विसपुते ज्वेलर्स व संजीवनी बँकेचे मॅनेजर सभारंजक तसेच शैलजा रोहम यांनी दिलेल्या देणगीतून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप कोपरगाव तालुक्यातील उद्योगपती कैलास शेठ ठोळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विसपुते ज्वेलर्सचे प्रेम विसपुते राजाभाऊ अजमेरे उत्तमभाई शहा डॉ.विलास आचारी संदीप अजमेरे ज्येष्ठ नागरिक मंचाचे कार्याध्यक्ष विजयजी बंब जेष्ठ नागरिक महिला समितीच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे रजनी ताई गुजराथी शैलजा ताई रोहम दिव्यांका परदेशी संजीवनी बँकेचे मॅनेजर सभारंजक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर आर लकारे उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर पर्यवेक्षक बलभीम उल्हारे विसपुते ज्वेलर्सचे मॅनेजर आकाश माळवे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल अमृतकर सर यांनी केले प्रथमता श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे संस्थापक श्रीमान गोकुळ चंदजी ठोळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी डॉ.विलास आचारी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाली की जिथे कमी तिथे आम्ही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नागरिक संघाने शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे युनिफॉर्म तसेच शैक्षणिक साहित्य आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून कोपरगाव शहरासह पंचक्रोशीतील शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन दरवर्षी गरीब होतकरू व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमचा छोटासा खारीचा वाटा आम्ही देत असतो साधारण आत्तापर्यंत चाळीस हजार विद्यार्थ्यांना युनिफॉर्म,शूज, शालेय उपयोगी साहित्य यांचे वाटप आम्ही काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने आम्ही ते करत असतो ही लहान मुलं पुढे देशाचे सुजाण नागरिक बनाव तसेच त्यांनी भविष्यामध्ये डॉक्टर वकील इंजिनीयर तसेच विविध क्षेत्रांमध्ये करियर करून आपल्या आई-वडिलांचे आपल्या शिक्षकांचे व आपले शाळेचे नाव उज्वल करावे असे शेवटी डॉ.विलास आचारी म्हणाले यानंतर जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या महिला अध्यक्ष सुधाभाभी ठोळे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की सबका साथ सबका विकास हे ध्येय घेऊन
आम्ही शहरासह ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी आमच्या जेष्ठ नागरिकांच्या वतीने शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य युनिफॉर्म शूज अशा विविध माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही काही दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो तसेच आत्तापर्यंत अडीच लाखांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप आम्ही केले आहे तसेच संजीवनी उद्योग समूह व प्रवरा मेडिकल ट्रस्ट तसेच आनंद ऋषीजी महाराज ट्रस्टच्या वतीने इंडोर गेम हॉल येथे मोतीबिंदू शिबिराचे मोफत शिबिर आयोजित करून शिबिरार्थी रुग्णांची मोफत तपासणी औषध उपचार ऑपरेशनचा खर्च तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे व आणण्याचा व त्यांच्या जेवणाचा खर्च आम्ही करत असतो आतापर्यंत ७०० पेशंटला ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाच्या वतीने मदत केली आहे पुढेही करत राहणार असे
शेवटी सुधाभाभी ठोळे म्हणाल्या त्यानंतर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका रजनीताई गुजराथी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे उप मुख्यध्यापक अनिल अमृतकर व पर्यवेक्षक बलभीम उल्हारे व संगीता मालकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर कैलास शेठ ठोळे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की श्रीमान गोकुळ चंदजी विद्यालयास उत्कृष्ट पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्व शिक्षकांचे त्यांनी आभार व्यक्त केले त्यानंतर कोपरगाव शहरासह पंचक्रोशीतील अनेक ज्येष्ठ राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे जेष्ठ व्यक्तिमत्व तसेच परदेशामध्ये देखील या विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत या शाळेची स्थापना १९३४ पासून या शाळेने अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम केले आज या शाळेचे वैभव मध्ये मोठी भर पडली आहे ती म्हणजे श्रीमान गोकुळचंदजी ठोळे यांना अभिप्रेत असलेली शाळा निर्माण करण्याचं कार्य आज अंतिम टप्प्यात आले आहे हा मोठा आमच्यासाठी अभिमान आहे असे शेवटी ठोळे म्हणाले यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देसाई सर यांनी केले तर आभार शाळेचे पर्यवेक्षक बलभीम उल्हारे सर यांनी मानले.