परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
श्री.क्षेत्र बेट कोपरगाव येथे परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांच्या भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यात येणाऱ्या मिती शके १९४७ श्रावण शुध्द अष्टमी शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव पार्वती विवाह सोहळ्या निमित्त सकाळी ९ वाजता श्री परम सद्गुरूंचे आगमन त्यानंतर ०९.३० वाजता श्री गुरु शुक्राचार्य मुखवटा स्थापन व पुण्याहवाचन त्यानंतर श्री परम सद्गुरूंची भव्य पालखीची मिरवणूक संपन्न झाल्यावर १०.३० वाजता शुक्र जन्मोत्सव व शिवपार्वती विवाह सोहळा संपूर्ण होणार आहे त्यानंतर दुपारी १२ वाजता मध्यान महाआरती होईल व त्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी अमोल अशोक भुसारे आनंद दत्तात्रेय टिळेकर आशिष अंबादास कोल्हे सतीश सुभाष कोतकर तुषार प्रवीण जमदाडे चंद्रशेखर भास्कर राहणे यांच्या वतीने सर्व भावी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे परम पूज्य महंत रमेशगिरीजी महाराज तसेच

कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमाचे परम पूज्य महंत परमानंदजी महाराज व कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थानचे परमपूज्य महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक (भैय्या) कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड सचिव ॲड संजीव कुलकर्णी, खजिनदार ॲड.गजानन कोऱ्हाळकर सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन तसेच सर्व ट्रस्टी, मंदिर प्रशासन, सर्व बेट ग्रामस्थ, ब्रह्मवृंद, कर्मचारी तसेच बेटातील सर्व तरुण मंडळे मित्रपरिवार व शिव-शुक्र भक्त गण यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.