संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी परिषद शपथविधी संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अस्खलीत इंग्रजी मधुन सादर केलेल्या ‘टॉकशो ’ ने सिध्द केले आहे की संभाषण कौशल्य वाढीस लागावे, यासाठी स्कूल चांगले प्रयत्न करीत आहे. त्यांची देहबोली सुध्दा समोरच्यांना मंत्रमुग्ध करणारी होती. व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु असतात, परंतु त्यात ‘संभाषण कौशल्य’ हे अत्यंत महत्वाचे आहे. ते येथे रूजविल्या जाते. चांगल्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबर इतर कौशल्येही महत्वाचे असतात, असे उद्गार माजी संचालक, सीटी बॅन्क, सावुथ एसिया अरूण वाबळे यांनी काढले.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कुलच्या चालु शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी परिषदची निवड लोकशाही पध्दतीने निवडणुक घेवुन निवडुन आलेल्या विद्यार्थी सदस्यांचा पदग्रहण समारंभात वाबळे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे अध्यक्षस्थानी होते. सदर पदग्रहण सोहळ्यास मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संचालिका डॉ.मनाली कोल्हे, सुभाष पाटील, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नंस डॉ.आर एस. शेंडगे , प्रिन्सिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम, प्राचार्या रीना रजपुत, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके, आदी उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांची संख्याही उल्लेखनिय होती. प्रारंभी प्राचार्या रजपुत यांनी विद्यार्थी परिषदेच्या सर्व सदस्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. वाबळे यांनी विद्यार्थ्यांना कर्तव्यनिष्ठा , प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणिव करून दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत शाळेच्या व्यवस्थापनाच्या समर्पित व अभ्यासपुर्ण दृष्टिकोनाचे अभिनंदन केले.यावेळी ‘युथ स्पिक्स: व्हाईस ऑफ चेंज’ या विषयावर विद्यार्थ्यांनी ‘टॉक शो ’ सादर केला. यात त्यांनी फिनलॅन्ड, जपान, आणि संजीवनी मधिल शिक्षण ण प्रणालीचे तुलनात्मक विश्लेषण न केले. तंत्रज्ञान, सर्जनशिलता आणि मुल्यशिक्षण यावर त्यांनी मांडलेले विचार श्रोत्यांना अंतर्मुख करणारे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना नितिनदादा कोल्हे म्हणाले की विद्यार्थी संसदेच्या माध्यमातुन उत्तम नागरीक घडत आहे. विद्यार्थी प्रतिनिधींनी आपापल्या पदांना न्याय देण्यासाठी समर्पण, योग्य दिशा आणि प्रामाणिक काम यांचा अवलंब करावा. विद्यार्थी संसद निवडीतुन विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणात निष्चित वाढ होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

तसेच वर्षभर विविध कामुलींमध्ये राजविका अमित कोल्हेे हीने सर्वात जास्त मते मिळवुन हेड गर्ल पदाची मानकरी ठरली तर मुलांमध्ये पार्थ भाऊराव गांगुर्डे याने सर्वाधिक मते मिळवुन हेड बॉय पदाचा मानकरी ठरला. मकाज पाहण्यासाठी विविध हाऊसेसच्या प्रतिनिधिंचीही निवड पुढील प्रमाणे करण्यात आली. यात पुढील प्रमाणे समावेश आहे. कंसात हाऊस व पदाचा उल्लेख आहे. शाश्वत समरेंद्र कुमार (विक्रमशिला -डेप्युटी हेड बॉय), भुवी स्नेहल कोठारी (इंद्रप्रस्थ-डेप्युटी हेड गर्ल), सिध्दी महेंद्र तांबे (विक्रमशिला -डिसीप्लिन कॅप्टन), श्रीजय निखिल बोरावके (नालंदा- स्पोर्टस् कॅप्टन), मेरिष्का सिध्दार्थ सबलोक (नालंदा-कल्चरल कॅप्टन), अक्षदा सुनिल पानगव्हाणे (तक्षिला-तक्षिला कॅप्टन), अर्जुन विजय वडांगळे (तक्षिला-तक्षिला डेप्युटी कॅप्टन), मीत मयुरेश कोल्ही (इंद्रप्रस्थ-इंद्रप्रस्थ कॅप्टन), समांन्वी सुुनिल शिंदे (इंद्रप्रस्थ-डेप्युटी इंद्रप्रस्थ कॅप्टन), राजवर्धन महेश जमदाडे (विक्रमशिला -विक्रमशिला कॅप्टन), भक्ती सतीश पानगव्हाणे (विक्रमशिला -डेप्युटी विक्रमशिळा कॅप्टन), वल्लभ अनिल कोते (नालंदा- नालंदा कॅप्टन), पिहु पंकज मोटे (नालंदा-डेप्युटी नालंदा कॅप्टन), विश्वसाई प्रितम वडगावे (ज्युनिअर हेड बॉय), त्रिशा सार्थक भनसाळी (ज्युनिअर हेड गर्ल), धनुश अजित पाटील (ज्यु. डिसिप्लीन कॅप्टन), पियुश पंकज संकलेचा (विक्रशिला -स्पोर्टस् कॅप्टन) व तपस्या सागर लांडगे (इंद्रप्रस्थ-ज्यु. कल्चरल कॅप्टन).क्रीडा शिक्षक विरूपक्ष रेड्डी यांनी निवडणुक प्रक्रिया पार पडण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.