Breaking
ए.जी.विद्यालय

राजर्षी छत्रपती शाहु महाराज राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार रघुनाथ लकारे यांना प्रदान

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

शैक्षणिक,सांस्कृतिक सामाजिक व विधायक क्षेत्रात अग्रेसर मिलिंद संस्था केंद्र शिंदे ता.जि.
नासिक संचालित लोकरंजन कलामंडळ यांच्या विदयमाने आयोजित महाराष्ट्र भुषण राजर्षी छत्रपती शाहु महाराज राज्यस्तरीय आदर्श यशवंत पुरस्कार २०२४ कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांना माजी आमदार डाॕ.सुधीर तांबे यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी संस्थापक मिलिंद राव जाधव,अध्यक्ष बाळासाहेब हांडे सर,कार्याध्यक्ष शाहीर देविदास जाधव सर,उपाध्यक्ष सौ.आशाताई दोंदे आदी मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की रघुनाथ लकारे सरांनी कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयत जुन ९३-९४ पासुन इंग्रजी विषय शिक्षक म्हणून कामाचा श्रीगणेशा केला विविध जिल्हा व तालुकास्तरावर इंग्रजी विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे.तसेच इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करतांना अनेक विदयार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

आज त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहे विदयालयांत इंग्रजी विषय शिक्षक म्हणून त्यांचे कार्य देखील उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय व शाळेबद्दल असलेली तळमळ लक्षात घेता शाळा कमिटीने देखील नुकतीच त्यांची सर्वानुमते उपमुख्याध्यापक पदी नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला होता रघुनाथ लकारे सर यांना हा पुरस्कार मिळाल्याने एक दुग्धशर्करा योग जुळून आल्यासारखा झाला आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे,आनंद ठोळे,
डाॕ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे, शाळेचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड,माजी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर सर,दिलीप तुपसैंदर सर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि श्रीमान गोकुळचंदजी परिवाराने त्यांचे अभिनंदन करुन पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »