श्री.गो.विद्यालयाचे विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी यांची तालुका विज्ञान संघटनेच्या सचिव पदी नियुक्ती

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील शिक्षक कुलदीप गोसावी यांची कोपरगांव तालुका विज्ञान-गणित संघटनेच्या सचिव पदी नुकतिच एकमताने निवड करण्यात आली. गोसावी हे श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत मागील २० वर्षा पासुन कार्यरत असुन ते तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यालयाची सर्व प्रकारची ऑनलाइन कामे ते पाहतात. स्कॉलरशिप,एन एम एम एस परीक्षांमधून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करुन त्यांना यश प्राप्त करून दिले आहे.
कोपरगांव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी या संघटनेवर ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.या निवडी बद्दल गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य डॉ.अमोल अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,दिलीप तुपसैंदर,
विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड, उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे,पर्यवेक्षक अनिल अमृतकर,विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गजानन शेटे,मकरंद कोऱ्हाळकर,न.पा. शिक्षण मंडळाचे साईश शिंदे तसेच अमित पराई, व
विदयालयांतील सर्व शिक्षक,शिक्षिका आदींनी अभिनंदन केले आहे.