श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात संत गाडगे महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे सचिव दिलीप अजमेरे अध्यक्ष कैलास ठोळे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे ,
डाॅ.अमोल अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे,आनंद ठोळे, राजेश ठोळे यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन केले.उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे व ज्येष्ठ विज्ञान शिक्षक दिगंबर देसाई सर यांनी संत गाडगेबाबाचे जीवना विषयी माहीती सांगितली. श्रीमती एस.डी.जाधव यांनी गाडगे महाराजांचे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, हे भजन गायले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली.विद्यालयाचे पर्यवेक्षकअनिल अमृतकर यांनी आभार मानले.सौ राजश्री बोरावके,सौ.कल्पना महानुभव,सुजाता अजमेरे, दिलीप कुडके,योगेश गवळे,
संजय बर्डे, एस.आर.अजमेरे आदि शिक्षक, शिक्षिका, विदयार्थी यावेळी उपस्थित होते.