श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकार दिन साजरा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील चांगल्या घडामोडी समाजापुढे आणणे व चुकीच्या घडणा-या गोष्टींवर अंकुश ठेवणे हे अतिशय अवघड काम पत्रकार करीत असतात,शाळेचा नावलौकीक वाढविण्यात पत्रकाराचे मोलाचे योगदान आहे.असे प्रतिपादन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे सदस्य व कार्यक्रमांचे अध्यक्ष डाॅ.अमोल अजमेरे यांनी पत्रकार गौरव समारंभ प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात नुकताच पत्रकार दिना निमित्त संस्थेचे सहसचिव सचिन अजमेरे,डाॅ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे आदींच्या शुभहस्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड, माजी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, दिलीप तुपसैंदर आदी शिक्षकाची उपस्थित उपस्थित सर्व पत्रकारांना गुलाबपुष्प व भेटवस्तु देण्यात आली.या प्रसंगी जेष्ठ पत्रकार संजय देशपांडे व पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज यांचे हस्ते आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला तर उपस्थितांचे स्वागत विदयालयांचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी तसेच प्रास्ताविक विदयालयाचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांनी केले.या प्रसंगी कोपरगांव एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे यांनी पत्रकार दिना निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर पत्रकाराच्या वतीने प्रा विजय कापसे यांनी शाळेचे व कमिटीचे आभार व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकार सोमनाथ सोनपसारे, संजय देशपांडे, मनोज जोशी, शंकर दुपारगुडे, हेमचंद्र भवर, मनिष जाधव,सिध्दार्थ मेहेरखांब, बिपीन गायकवाड, योगेश डोखे, सुनिल ससाणे, हाफीज शेख, अनिल दीक्षित,संतोष जाधव,शैलेश शिंदे,स्वप्नील कोपरे,संजय लाड,विनोद जवरे, मधुकर वक्ते,अमोल गायकवाड, राजेंद्र तासकर, रहिमखाॅ पठाण, सोमनाथ डफळ यांच्या सह अनेक माध्यम प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश गोरे यांनी तर आभार विदयालयाचे पर्यवेक्षक अनिल अमृतकर यांनी मानले.कार्यक्रमाला शिक्षक,विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.