समाजकल्याण मंत्री ना.संजय शिरसाठांची कोपरगावला भेट आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ यांनी नुकतीच कोपरगावाला धावती भेट दिली. यावेळी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपोभूमी येथे साईबाबांचे मनोभावे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ यांचे स्वागत केले.देशाच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येणारे साईभक्त राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी लगत असलेल्या पवित्र गोदावरी नदीच्या तीरावरील श्री.साईबाबा तपोभूमी येथे आवर्जून येत असतात.कोपरगाव शहर साईबाबांची तपोभूमी असून या ठिकाणी साईबाबा तीन दिवस वास्तव्यास होते.

या ठिकाणी साईबाबां मोठे मंदीर उभारण्यात आले असून साईबाबांची तपोभूमी म्हणून या मंदिराची ओळख आहे. शिर्डीला येणारे हजारो साई भक्त येथे दर्शनासाठी येतात.व याच मार्गावरून राज्याचे समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ जात असतांना त्यांनी श्री साईबाबा तपोभूमी येथे साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.
भक्तिमय स्थळे हे केवळ धार्मिक केंद्रच नाहीत तर ते समाजाच्या मानसिक आणि भावनिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. भक्तिमय परिसरातील शांती आणि समाधानी वातावरण मनावर सकारात्मक परिणाम करणारे असते त्याची अनुभूती श्री साईबाबा तपोभूमी येथे येते.येथील भक्तीमय परिसर मनाला प्रसन्नता देणारा असून साईबाबांनी तपश्चर्या केलेल्या व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत साईबाबांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. साईबाबांच्या कृपेने जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी होवून समाजसेवा करण्याची अधिकची शक्ती साईबाबा देतील असा विश्वास समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ यांनी याप्रसंगी व्यक्त केली.