महाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीचे कार्य देशाला मार्गदर्शक – निवडणूक आयुक्त संधू

0 5 3 7 6 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीचे कार्य देशाला मार्गदर्शक – निवडणूक आयुक्त संधूअमेरिकेच्या अमेरिकन मेरिट कौन्सिलने प्रदान केलेला गौरव जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह असून स्वीप समितीचे कार्य राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखविंदर संधू यांनी केले.शिर्डी येथील भेटीच्या वेळी संधू बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संधू यांच्या हस्ते कौन्सिलचे गौरवपत्र स्वीकारले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, जिल्हा मतदारदूत डॉ. अमोल बागुल, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदी उपस्थित होते.अमेरिकन मेरिट कौन्सिल ही आय.एस.ओ. प्रमाणे अमेरिकास्थित गुणवत्ता नामांकन व मानांकन देणारी परीक्षण संस्था असून याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जा आणि मानकीकरण प्रदान केले जाते. अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीच्या निवडणुकीतील विविध उपक्रमासाठी संस्थेकडून हे प्रमाणपत्र जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.जिल्हाधिकारी सालीमठ यांनी मतदान प्रक्रियेतील मतदार नोंदणी, स्वीप उपक्रम याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीच्या वैशिष्ट्यपूर्ण मतदार जनजागृती उपक्रम अंतर्गत राबवलेल्या विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे.

जाहिरात
जाहिरात

माहिती व तंत्रज्ञानाचा अचूक व चपखल वापर स्वीप समितीने केल्याने मतदारांना मतदान प्रक्रीयेविषयी सुलभतेने माहिती मिळाली. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम केल्याने मतदान टक्केवारी वाढविण्यात देशात व राज्यात जिल्हा सरस ठरला आहे. यापुढील कालावधीतदेखील नाविन्यपूर्ण स्वीप उपक्रमातून मतदार जनजागृतीचे कार्य निरंतर चालू राहील असेही, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदार जनजागृतीह उपक्रमांचा अहवाल यावेळी संधू यांना देण्यात आला. त्याचबरोबर व्हीआर बॉक्सच्या माध्यमातून मतदान केंद्रातील बाह्य व अंतर्गत रचनेचा थ्रीडी व्हिडिओ उपक्रमाची माहिती त्यांनी स्वत: उपकरणाचा उपयोग करून घेतली. स्वीप समितीच्या गुगल असिस्टंटच्या मतदार जनजागृती उपक्रमाविषयी त्यांनी विशेषत्वाने जाणून घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे