साहित्यिक व गझलकार राम गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव ता.पैठण जि. संभाजीनगर येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान यांच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार कोपरगाव येथील साहित्यिक व गझलकार राम गायकवाड यांना जाहीर झाला असून अशी माहिती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान प्रमुख तथा आयोजक ह.भ.प. आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर व आयोजक चित्रपट निर्माते संदीप राक्षे यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की साहित्य क्षेत्र, कला व सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तीला हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. राम गायकवाड यांची कथा, कविता,नाट्य,अभिनय,या क्षेत्रात अभिनव व उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यांनी ५ चित्रपट ३ मराठी सिरीयल,११ नाटके, अशा विविध प्रकारामध्ये अभिनय केलेला असून चित्रपटा साठी गीत लेखन व पटकथा लेखन देखील कलेले आहे. ” गाजरांची पुंगी,रे राया,मुसंडी, अधांतर आदी चित्रपटात काम केले आहे. तर त्यांचे एकूण ५ स्वलिखित गाण्यांचे अल्बम प्रसिध्द आहेत तसेच राज्य नाट्य स्पर्धेमधेही त्यांनी त्याचा अभिनयाचा ठसा उमटविला आहे. आखिल भारतीय मराठी चित्रपट कार्यकारणीचे ते सदस्य आहेत.मराठी साहित्यातील गझल काव्य प्रकारात गझल लेखन करत आहे.त्याच्या या साहित्य क्षेत्र, व सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामाची दखल घेवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान यांच्या वतीने बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २५ रोजी सकाळी १० वाजता निमंत्रित साहित्यिकांचे संमेलन या प्रतिष्ठित कार्यक्रमास जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे या वर्षीचा “जीवन गौरव पुरस्कार” राम गायकवाड यांना जाहीर झाला आहे. त्या बद्दल त्यांचा आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी तसेच शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक व भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर जिल्हा संघटक व कोपरगाव तालुक्याचे पालकमंत्री बिपिन गायकवाड तसेच विविध श्रेत्रातील अनेक जेष्ठ मंडळींनी व मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहे.




