मनसे विद्यार्थी सेना उत्तर नगर उपजिल्हाध्यक्ष पदी रोहित एरंडे पा. यांची निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे अहमदनगर येथे दिल्ली गेट जवळील मनसे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अहमदनगर येथे आले असता त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते त्याप्रसंगी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी विद्यार्थी सेनेच्या उत्तर नगर उपजिल्हाध्यक्ष पदी रोहित एरंडे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे रोहित एरंडे पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेहमीच सक्रिय असे मनसैनिक आहेत या निवडी प्रसंगी राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे प्रमुख संघटक ॲड. दिपक शर्मा राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे उत्तर नगर जिल्हा संघटक सागर माने यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्हा सह सर्व तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी व सर्व सैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उत्तर नगर उपजिल्हाध्यक्षपदी रोहित एरंडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी रोहित एरंडे पाटील म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमितजी ठाकरे साहेब यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती खऱ्या अर्थाने विद्यार्थी सेना गावागावात वाड्यावस्त्यांन पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे काम तळागाळातील विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचवून विद्यार्थी सेनेला बळ देण्याचे काम मी या उत्तर नगर जिल्ह्यातून नक्कीच करीन व माननीय अमित जी ठाकरे साहेब यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचे मी नक्कीच सोने केल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी रोहीत एरंडे पाटील शेवटी म्हणाले.