संजीवनी उद्योग समूह

खेळ पैठणीचा कार्यक्रमाला वारी येथे महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

0 5 4 0 5 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

गणेशोत्सवानिमित्त संजीवनी
स्वयं सहाय्यता महिला बचत गटाने आयोजित केलेला सन्मान नारीशक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम वारी येथे झाला.या वेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्या उपस्थितीत वारी व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने हजर होत्या.आधुनिक युगात महिला गौरी देखील आहेत आणि वेळप्रसंगी दुर्गा देखील होऊ शकतात हे सिद्ध करण्याची गरज आहे.चूल आणि मूल या पलीकडे आपल्या कर्तुत्वाची ओळख सर्वत्र महिला करू शकतात.दैनंदिन कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना महिलांना मनोरंजन व कामातून विरंगुळा मिळावा यासाठी हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.महिला संघटन करून स्नेहलताताई कोल्हे यांनी संजीवनी महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळपास चाळीस हजार महिला जोडलेल्या असून त्यांना कौटुंबिक आर्थिक हातभार लावण्यास बचत गट मोलाचे ठरले आहेत.भरघोस बक्षिसांची संख्या असणारा स्तुत्य उपक्रम मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.श्री गणराया हे स्री शक्तीला मानाचे स्थान देणारे देवता आहे.महिलांची शक्ती ओळखून रिद्धी व सिध्दी यांना दिलेले स्थान आपण जाणतो.महिला या बुद्धिमत्ता आणि कर्तुत्वाने कुठेही कमी नसून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून संधी देणे ही सामाजिक जबाबदारी आहे.केवळ घरकाम करने हे स्रीचे क्षेत्र नसून प्रत्येक क्षेत्रात अभिमान वाटेल असे काम आज महिला करता आहेत.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी अनेक विकासकामे या वारी गावात केली.विवेकभैय्या देखील जनसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सतत अग्रेसर आहेत कारण सेवा हाच मोठा धर्म मानून आम्ही चालतो आहोत असे सौ.रेणुका कोल्हे म्हणाल्या.महिला शक्तीचा जागर व्हावा यासाठी असे उत्सव हे केंद्र ठरावे.अलीकडे ज्या घटना आपण ऐकतो महिला अत्याचार घडतात त्यावर कठोर कृती होण्यासाठी सर्वप्रथम महिला सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी बचत गटाच्या ऐक्याची देखील भूमिका महत्वाची ठरणार आहे.कोल्हे कुटुंबाने आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेल्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित असणे हे एक प्रकारे जगदंबा मातेचे आशीर्वाद आहेत असेही मत शेवटी सौ.कोल्हे यांनी व्यक्त केले.प्रा.गणेश कांबळे आणि सुमित काळोखे यांनी या कार्यक्रमात आपल्या अनोख्या शैलीने रंगत आणली.उपस्थित महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे,उखाणे,खेळ यातून वातावरण अगदी आनंदमय झाले होते.यावेळी वारी आणि पंचक्रोशीतील महिला भगिनी,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे