‘ जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं ‘ म्हणत पुरस्कारार्थिंच्या कर्तुत्वाचे विवेकभैय्या कोल्हे यांनी केले कौतुक

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ज्येष्ठ नागरिक मंच व ज्येष्ठ महिला समितीच्या वतीने डॉ.मुळे,डॉ.चोपडा, डॉ.आचारी यांना जीवनगौरव प्रदान सातत्याने सामाजिक उपक्रमात सक्रिय असणारे ज्येष्ठ नागरिक मंच आणि जेष्ठ महिला समिती यांनी सुरू केलेला पुरस्कार वितरण उपक्रम पार पडला. २०२५ चे जीवनगौरव पुरस्कार ,डॉ.डी.एस.मुळे,डॉ.मनोज चोपडा,डॉ.विलास आचारी यांना सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना वैद्यकीय अडचणी घेऊन लोक मोठ्या प्रमाणात येत असतात.

त्यावेळी अनेकांना डॉ.मुळे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले जाते त्यातून अनेकांचे उपचार योग्य होतात हे समाधान वाटते.२४ तास उपचारासाठी सेवेसाठी सदैव ते उपलब्ध असतात.डॉ.मुळे यांनी मागील ४० वर्षात सदैव सर रुग्णसेवेत सेवा करताना आपल्याला दिसत आहे. ७६ हजारांहून अधिक रुग्ण सरांनी बरे केलेले आहे. सेवा हाच धर्म समजून अहोरात्र चाळीस वर्षे सेवा करत आहे. या बद्दल आम्ही नतमस्तक आहोत.आपण किती वर्ष जगलो, या पेक्षा केलेलं कार्य किती महत्त्वपूर्ण आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. मनोज चोपडा. त्यांना अगदी कमी वयात जीवनगौरव पुरस्कार मिळवला हे खरचं कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी ७२ हजारांहून अधिक शस्त्रक्रिया झाल्या ही अभिमानास्पद गोष्ट आहे.डॉ.विलास आचारी हे ज्येष्ठ नागरिक मंच्याच्या वतीने धर्मार्थ दवाखना चालवतात यामध्ये उपचार आणि औषध अगदी मोफत दिले जातात. त्यांची पुढची देखील हा वारसा समर्थपणे चालवत आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहे. या सर्वांना कोल्हे परिवार आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने भावी वाटचालीस शुभेच्छा देतो.
आपल्या सर्वांच्याच हातून देशाची समाजाची सेवा घडत राहो. त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. खरं तर आज पुरस्काराची उंची वाढली असं मी समजतो, तसेच अतिशय स्तुत्य उपक्रम ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने कोपरगांव शहरात घेतले जातात याचे विशेष कौतुक वाटत.या प्रसंगी चित्रपटाच्या ” जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं ” या वाक्याचा संदर्भ देत सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लकेर उमटवीली.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा सुधा भाभी ठोळे यांच्यासह जवाहरलाल शहा कैलास ठोळे,राजेश परजणे,काका कोयटे,विजय बंब,शोभना ढोले, उत्तमभाई शहा,श्रीमती गुजराती ताई,नारायण अग्रवाल,बबलू वाणी,विनोद राक्षे,दिलीप अजमेरे,कांतीलाल अग्रवाल,भरत मोरे,डॉ.अजय गर्जे,केशवराव भवर,साहेबराव रोहोम,अरुणराव येवले,सतीश रानोडे तसेच जेष्ठ नागरिक सेवा मंच सभासद,डॉक्टर्स वकील आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते.