भरघाव कंटेनरने स्विफ्ट डिझायर व ट्रॅक्टरला दिली जोराची धडक

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरालगत असलेल्या पुणतांबा फाटा ते येवला रोड दरम्यान भरघाव कंटेनर आर जे १४ जी.पी ९७९६ हा कंटेनर चालक भरघाव वेगाने मनमाड कडे जात असताना मारुती स्विफ्ट डिझायर एम एच ०४ इ टी ७८५७ हिला जोराची धडक देऊन पळून जात असताना पुन्हा साईबाबा कॉर्नर येथील येवला रोड लगत असलेल्या सोसायटी पेट्रोल पंपा जवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक देऊन ट्रॅक्टरचे मोठे नुकसान केले याबाबत शांताराम नामदेव बागुल राहणार लोणी तालुका राहता यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कंटेनर चालक ब्रह्मजीत शिवसिंग कुंतल याने प्रथम पुणतांबा फाटा येथे दिनांक ६ मे २०२५ रोजी दुपारी ०४ वाजून १५ मिनिटांनी जोराची धडक दिली त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले

असून सदर कंटेनर चालकाने घटनास्थळी न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा येवला रोड येथील सोसायटी पेट्रोल पंपा समोर उभे असलेल्या ट्रॅक्टर एम एच ३० ए.व्ही ५१०५ यास मागून धडक दिली असून यामध्ये ट्रॅक्टरचे मागील टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये २३२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम२८१,३२४(४),साह. मोटार वाहन कायदा अधिनियम कलम १३४(अ),(ब),१८४,१८७ प्रमाणे सदरचा कंटेनर चालक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल के.ए जाधव हे करीत आहे.