एस पी च्या विशेष पथकाची कोपरगाव शहर व तालुका पोलिस ठाणे हद्दीत छापे २५ जणांसह १४ लाख 3 हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील येसगाव येथे मटका जुगार अड्ड्यांवर डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणा वरुन १९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तेथून ११ लाख १९ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांचा छापा पडल्याचे समजतात तेथील मुख्य सूत्रधार व इतर चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २ लाख ८४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यातील प्रमुख दोन आरोपींना विशेष पथकाने ताब्यात घेतले असून याबाबत शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
बातमी अद्यावत होत आहे ??