नायलॉन मांजा विरोधात कोपरगाव शहर पोलीसांची करडी नजर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तसेच पतंग विक्री करणाऱ्या दुकानदारांनी नायलॉन मांजा विक्री अथवा जवळ बाळगू नये याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी आज शहरांमध्ये आगामी मकरसंक्राती सणाच्या अनुषंगाने मोठया प्रमाणात पतंग उडविण्यात येतात.पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरण्यात येतो,नायलॉन मांजा वापरण्यास प्रतिबंध असल्याने तरुणांनी नायलॉन मांजा वापरू नये याबाबत मुख्य बाजारपेठ तसेच पतंग खरेदी विक्री दुकाणदार यांना मांजा खरेदी विक्रि करु नये अथवा जवळ बाळगु नये या बाबत जनजागृती करण्यात आली तसेच के. जे. सोमय्या कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनांना मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये

याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच पोलीस स्टेशनच्या व्हॉटसॲप द्वारे तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन नॉयलॉन मांजाचा वापर अथवा विक्री व खरेदी करु नये या करीता जनजागृती करण्यात आली त्याचप्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार हे साध्या वेशात नायलॉन माझ्या खरेदी अथवा विक्री करणाऱ्या वर नजर ठेवून असल्याने तसेच वेळोवेळी अनेक भागांमध्ये दुकानांची झाडाझडती देखील घेतली जाणार आहे तेव्हा कोणीही नायलॉन मांजा खरेदी अथवा विक्री करू नये तसेच कुठे नायलॉन मांजा ची विक्री होत असल्यास त्वरित कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना माहिती कळविण्याचे आव्हान केले आहे.