गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी विजय वहाडणे नगरपरिषदेच्या रिंगणात

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी(वसंत स्मृती कार्यालय) येथे भाजपाच्या निवडक कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.भाजपाने आयोजित केलेल्या निवडणुकीच्या बैठकीत कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीने लढविण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व विनायकराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.उपस्थित सर्वच भाजपा कार्यकर्त्यांनी आपआपले विचार मांडून नगरपरिषद निवडणूक लढविण्याचे एक मताने ठरविण्यात आले.कोपरगाव नगरपरिषदेचा कारभार करतांना विजयराव वहाडणे यांनी कुठलाही पक्षीय किंवा धार्मिक भेदभाव न करता सर्वच प्रभागात विकास कामे केलेली आहेत.केलेल्या विकासकामांची “कर्तव्य” ही पुस्तिकाही त्यांनी प्रकाशित केलेली आहे. आजपर्यंत कुणीही असा अहवाल प्रकाशित करून जनतेसमोर ठेवलेला नाही.केलेली विकासकामे जनतेसमोर ठेवून निवडणूकीला सामोरे जाण्याचे ठरविण्यात आले. सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केल्यामुळे पाच वर्षात जनतेचा एकही मोर्चा नगरपरिषदेवर आला नाही. सर्व नगरसेवक,नागरिक व नगरपरिषद कर्मचारी यांना सोबत घेवून काम करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा नगराध्यक्षपद मिळाल्यास कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास होईल म्हणून निवडणूक लढविण्यास सर्वांनी सहमती दर्शवली तसेच.

नगराध्यक्ष झाल्यापासून ते आजपर्यंत विजयराव वहाडणे हे सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच उपलब्ध आहेत हे सर्व नागरिकांना माहित आहे,त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या निर्णयानुसार होऊ घातलेली कोपरगाव नगरपरिषदेची निवडणुकी मध्ये नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.